पोलीस मित्र मेळावा उत्साहात

By Admin | Updated: May 29, 2016 23:55 IST2016-05-29T23:29:14+5:302016-05-29T23:55:01+5:30

मनमाड : ज्येष्ठ नागरिकांचा केला सत्कार

With the enthusiasm of Police Friends Meet | पोलीस मित्र मेळावा उत्साहात

पोलीस मित्र मेळावा उत्साहात

 मनमाड : येथील सिनियर्स कट्टा व पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मनमाड येथे पोलीस मित्र मेळावा व व्यसनमुक्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त वयाची पंचाहत्तरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करण्यात आला.
येथील पोलीस परेड ग्राउंडवर आयोजित कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. राहुल खाडे यांनी प्रास्ताविकामधून मेळाव्याचा हेतू विशद केला.
मनमाड, नांदगाव, चांदवड, येवला, वडनेरभैरव येथील वयाची पचाहत्तरी पूर्ण केलेल्या नागरिकांचा प्रमाणपत्र व शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
बाळू इंगळे यांनी सादर केलेल्या विनोदी कार्यक्रमाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले. या सांस्कृतिक कार्यक्रमातून व्यसनमुक्तीवर जनप्रबोधन करण्यात आले. युवकांनी विविध गीतांवर नृत्य सादर
केले.
यावेळी माणिकराव शिंदे, सचिन दराडे, पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे, पो.नि. दीपक वाघमारे, पो.नि.रुपचंद वाघमो, पो.नि.अरुण निकम, पो.नि. अनंत मोहिते, पो.नि. नितीन पाटील यांच्यासह
मनमाड उपविभागीय कार्यालय अंतर्गत पोलीस ठाण्याचे पोलीस मित्र व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होेते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता महाले यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: With the enthusiasm of Police Friends Meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.