शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या विद्यार्थ्यांचा पर्यावरणस्रेही गणेशोत्सवावर भर, कागदी गणेशमुर्तींची निर्मीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 13:08 IST

मुलांनी आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करत लहानमोठ्या आकारातल्या वैशिष्टयपुर्ण मुर्ती साकारल्या

ठळक मुद्देमुलांनी आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करत लहानमोठ्या आकारातल्या वैशिष्टयपुर्ण मुर्ती साकारल्या

नाशिक- आजचे विद्यार्थी म्हणजे उद्याचे भविष्य मानले जाते. त्यांनी गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाला घातक गोष्टी टाळून पर्यावरणपुरक गोष्टींचा आग्रह धरला तर त्यासारखी दुसरी समाधानाची गोष्ट नसेल. याचा प्रत्यय देणारा उपक्रम नाशिकच्या पेठे हायस्कूलमधील राबविण्यात आला असून त्यामुळे उद्याचे भविष्य उज्वल असेल याची खात्री पटू शकणार आहे.पेठे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना शाळेने आयोजीत केलेल्या मुर्ती कार्यशाळेत कागदापासून सुरेख मुर्ती साकारल्या आहेत. टाकाऊपासून टिकाऊ ही कल्पना समोर ठेवत विद्यार्थ्यांनी आकर्षक गणेशमुर्ती बनवल्या असून स्वत:च्या कृतीतुन पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे.चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शाळेने रद्दी उपलब्ध करुन दिली. त्यापासून मुलांनी आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करत लहानमोठ्या आकारातल्या वैशिष्टयपुर्ण मुर्ती साकारल्या. त्यांच्यावर रंगरंगोटी, सजावटकामही केले. मुलांच्या कलाविष्कार पाहून शिक्षक, पालकही भारावून गेले होते. चित्रकलेचे शिक्षक मनिष जोगळेकर यांनी मुलांना मार्गदर्शन करीत त्यांच्यातल्या सृजनशिलतेला प्रोत्साहन दिले. मुर्ती तयार झाल्यावर त्या नैसर्गिक रंगांनी रंगविण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी या मुर्ती घरी नेल्या असून त्यांची प्रतिष्ठापनाही करण्यात येणार आहे. शाडूमातीच्या मुर्ती फार मोठ्या आकारात तयार करता येत नाही. ही अडचण लक्षात घेऊन कागदाचे माध्यम वापरण्यात आले. ते यशस्वी झाल्याने पुढिल वर्षी आणखी चांगल्या मुर्ती साकारण्याचा मानस विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.  कागद, टिशु पेपर, लाकुड, डिंक, तार व सजावटीसाठी मोती, डायमंडचा वापर केला गेला. मुर्ती साकारताना मुलांच्या चेहेऱ्यावर वेगळेच समाधान दिसत होते. मुर्ती घरी नेल्यानंतर पालक, नातेवाईक, मित्रमंडळी यांनीही त्याचे कौतुक केल्याने मुले आनंदी झाली होती.

 

टॅग्स :NashikनाशिकGaneshotsavगणेशोत्सव