शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
3
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
4
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
5
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
7
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
8
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
9
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
10
तुमच्या गृहकर्जाचा हप्ता ४००० रुपयांनी होईल स्वस्त; बँक बदला आणि लाखो रुपये वाचवा! ही आहे पद्धत
11
"मी कितीही स्पष्टीकरण दिलं तरी...", ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चनने सोडलं मौन
12
ढगफुटी झाली आणि पूर आला; गाडी नदीत अडकता ड्रायव्हर चढला टपावर, पुढे काय झालं?
13
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
14
Ashadh Ritual 2025: आषाढात लेकीला माहेरी बोलावण्याची पूर्वापार प्रथा, केला जातो 'असा' कौतुक सोहळा!
15
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
16
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
17
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
18
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
19
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
20
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार

तिन्ही अनी आखाड्यांचे ध्वज दाखल

By admin | Updated: August 17, 2015 23:54 IST

तिन्ही अनी आखाड्यांचे ध्वज दाखल

नाशिक : साधुग्राममध्ये बुधवारी (दि.१९) दिगंबर, निर्मोही, निर्वाणी या तिन्ही अनी आखाड्यांत ध्वजारोहण होणार आहे. त्यासाठी आखाड्यांमध्ये तयारी सुरू आहे. तिन्ही अनी आखाड्यांचे ध्वज सोमवारी (दि.१७) दाखल झाले. ध्वजारोहणासाठीची आखाड्यांत तयारी अंतिम टप्प्यात असून, विधीवत पूजन करून ध्वजस्तंभ उभारण्यात आले आहेत. दिगंबर अनी आखाड्याचा ध्वज पाच रंगाचा, तर निर्वाणीचा लाल आणि निर्मोही अनी आखाड्याचा ध्वजेचा रंग पांढरा आहे. तीन महिने आखाड्यांचे ध्वज तयार करण्यासाठी लागले. ध्वजावरील इष्टदेव हनुमानाच्या निशाणीचे चित्र प्राची पोद्दार यांनी रेखाटले. मुंबईत ध्वजावर नक्षीकाम करण्यात आले. पोद्दार कुटुंबीयांच्या आॅल इंडिया इंडस्ट्रीजने ध्वज तयार करण्याचे काम हाती घेतले होते. ध्वज निर्मितीसाठी त्यांना अशोक नागपुरे, संतोष यादव, रोहन यादव यांचे सहकार्य मिळाले. हनुमानाचे विधीवत पाठ सुरू असताना ध्वजाचे काम पूर्ण करण्यात आले. हनुमान चालिसाचे ११०० पाठ या काळात करण्यात आले. दीड बाय तीन फूट हनुमानाची निशाण ध्वजावर साकारण्यात आली आहे. श्लोकाप्रमाणे धाग्यामध्ये रंग भरण्यात आले आहेत. परिवाराला ध्वजा तयार करण्याचा योग मिळाल्याने आनंद झाला. तिन्ही अनी आखाड्यांच्या महंतांनी ध्वजा तयार करण्याला मान्यता दिली. यावेळी महंत भक्तिचरणदास, महंत वैष्णवदास, महंत राजेद्रदास, महंत धर्मदास, महंत परमात्मादास, अरविंद मिश्रा उपस्थित होते. (प्रतिनिधी)