जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला ईएनटी तज्ज्ञांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:13 IST2021-05-30T04:13:07+5:302021-05-30T04:13:07+5:30
नाशिक : जिल्ह्यातील म्युकरमायकोसिस रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता, जिल्हा सामान्य रुग्णालय येथे मनुष्यबळ व आधुनिक साधन सामग्री ...

जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला ईएनटी तज्ज्ञांचा प्रतिसाद
नाशिक : जिल्ह्यातील म्युकरमायकोसिस रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता, जिल्हा सामान्य रुग्णालय येथे मनुष्यबळ व आधुनिक साधन सामग्री उपलब्ध होईपर्यंत रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून खासगी कान, नाक व घसा तज्ज्ञ डॉक्टर्स यांना सेवा देण्याचे आवाहन केले होते.
जिल्हाधिकारी मांढरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत म्युकरमायकोसिस रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी खालील सहा डॉक्टर्सने सहमती दर्शविली आहे. त्यात डॉ. नितीन देवरे हे सोमवारी, डॉ. राजेन्द्र पगारे हे मंगळवारी, डॉ. मुकेश मोरे हे बुधवारी व गुरुवारी, डॉ. सौमीन गडकरी हे मंगळवार व शुक्रवार, डॉ. गुंजन मनचंदा हे शनिवारी आणि डॉ. गिरीश नेहते हे गुरुवारी त्यांची सेवा नाशिक जिल्हा रुग्णालय येथे देणार आहेत.