शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

साध्या जीवन शैलीने पर्यावरणाचे होईल संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 14:17 IST

जगातील जवळपास शंभर पेक्षा जास्त देशामध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. यामागील मुख्य उद्देश्य इतकाच की, जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि    संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे असा आहे.

ठळक मुद्देपर्यावरण दिन औचित्य, संवर्धन कायमच करावेसाध्या दैनदिन कामात काळजी घेऊन टाळता येईल प्रदुषण

जागतिक पर्यावरण दिवस- २००९ या वर्षाची संकल्पना ही बदलत चाललेले हवामान आणि वातावरणातील कार्बनचे प्रमाण याविषयीची आहे. त्याचा विचार केला तर जगातील प्रत्येक व्यक्तीने सहकार्य करु न वाढते कार्बन डायआॅक्साईडचे प्रमाण कमी होऊन आॅक्सीजनचे प्रमाण वाढण्यास नक्कीच मदत होईल. हवामान बदलातील फरक लक्षात घेता शितगृहातून निघणा-या क्लोरे-फ्लुरो कार्बन वायूचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे. पर्यावरणाविषयक जनजागृती करण्यासाठी आज सभा, संमेलने, चर्चासत्रांचे आयोजन करणे गरजेचे आहे. घनकचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रि या करु न त्याची विल्हेवाट लावणे, घातक वायू गळतीला आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करणे, कारखान्यांच्या धुराड्यातून तसेच वाहनांमधून होणा-या उत्सर्जनाची रासायनिक तपासणी व त्यावरील उपाय यांचे काटेकोरपणे पालन करणे. सरोवरांचे संरक्षण व संवर्धन तसेच सरोवरातील वन्यजीवांचे संरक्षण व विकास यावर भर देऊन त्याचे महत्त्व जनमानसात पटवून देण्यासाठी चर्चासत्रे आयोजित करता येऊ शकतात.नद्यांचे प्रदूषण शहरी सांडपाण्यामुळे होत असल्याने त्या विषारी बनत आहेत. त्यासाठी त्या ठिकाणी पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. पर्यावरण व प्रदुषणासंदर्भात केंद्र व राज्य शासनाने संमत केलेल्या अधिनियम व नियमावलीचे काटेकोर पालन करणे या प्रकारचे वेगवेगळे उपक्र म राबविल्यास आपण ख-या अर्थाने पर्यावरणाच्या समृद्धीचा दिशेने वाटचाल करु , यात शंका नाही.पर्यावरण हा विषय कधीच संपत नसतो. त्यामुळे त्यावर सातत्याने काम करणे आवश्यक आहे. आपल्या हाती असलेले कार्य आपल्या घरु नच सुरु वात करु या. पुन्हा पुन्हा वापरात येऊ शकणा-या वस्तू जसे पेपर, काचेच्या वस्तू, अल्युमिनियम, मोटरआॅईल अशांची पुनर्निर्मिती करता येईल. हातांनी जे काम करु शकतो ते काम इलेक्ट्रीक उपकरणाशिवाय केले पाहिजे. शक्य असल्यास गरम पाण्याऐवजी थंड पाण्याचा वापर करावा. प्लॅस्टीक पिशव्यांऐवजी परत परत वापरता येणाºया कागदी पिशव्या वापरल्या पाहिजेत. अन्न आणि भाजीपाला प्लॅस्टीकमध्ये न ठेवता अल्युमिनियम पापुद्र्यात ठेवता येईल. पाण्याचा गैरवापर करणे थांबवा. घरातील रु म हिटरचा वापर न करता स्वेटर घालून इलेक्ट्रीक ऊर्जेचा वापर टाळा, गरज नसल्यास घरातील टी.व्ही., बल्ब तसेच अन्य इलेक्ट्रीक उपकरणाचा वापर थांबवा, घरातून बाहेर पडताना पाण्याचा हिटर, पंखा, विजेचा दिवा बंद करण्याची काळजी घेणे आवश्यक आहे. याशिवाय आणखी एक पाऊल पुढे जाऊन, पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे काम करणा-या एखाद्या स्वयंसेवी संस्थेचे सभासद होऊन पर्यावरण वाचविण्यासाठी विविध मोहिमा राबवू या आणि या  माध्यमातूनच जनजागृती करता येईल.आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर असताना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करु न चालणार नाही. निसर्गावर अन्याय करतो हे आपण त्सुनामी, नरगिससारखी सागरी वादळे, भूकंप, ढग फूटी, महापूर, दुष्काळ रोगराई अशा अनेक नैसर्गिक प्रकोपाद्वारे जाणवला आहे. हे सर्व लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण उपक्र म राबविल्यास आपण पर्यावरणाचा समतोल राखू शकतो आणि अर्थाने समृद्धीच्या दिशेने वाटचाल करु शकतो.

- सोनम रोकडे मोरे, पर्यावरण अभ्यासक

टॅग्स :NashikनाशिकenvironmentवातावरणGovernmentसरकार