एकपात्री प्रयोगातून मतदार नोंदणीसाठी प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 22:40 IST2018-09-27T22:38:44+5:302018-09-27T22:40:01+5:30
पेठ : विविध शासकीय योजना व अभियानाच्या यशस्वी कार्यवाहीसाठी शासनाकडून निरनिराळे फंडे वापरले जात असून, पेठ तहसील कार्यालयाच्या वतीने मतदार नोंदणी अभियान यशस्वी करण्यासाठी एकपात्री प्रयोगांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

एकपात्री प्रयोगातून मतदार नोंदणीसाठी प्रबोधन
ठळक मुद्देएकपात्री प्रयोगातून जनजागृती
पेठ : विविध शासकीय योजना व अभियानाच्या यशस्वी कार्यवाहीसाठी शासनाकडून निरनिराळे फंडे वापरले जात असून, पेठ तहसील कार्यालयाच्या वतीने मतदार नोंदणी अभियान यशस्वी करण्यासाठी एकपात्री प्रयोगांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
येथील शिवचरित्रकार एकपात्री शिवकलाकार संकेत नेवकर यांनी शहरातील महाविद्यालये व शासकीय वसतिगृहातील नवमतदारांना मतदान नोंदणी करून मतदारांची संख्या वाढविण्यासाठी एकपात्री प्रयोगातून जनजागृती करण्यात आली. तसेच पोषण आहार अभियाननिमित्त एकपात्री प्रयोग सादर करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार हरिष भामरे, जयश्री शिंदे आदी उपस्थित होते.