नाशिक : पहाटेची थंड हवा, हिरवागार निसर्ग, गोदाकाठ शांत व रमणीय परिसर अन् या वातावरणात लहान मुलांसह वृद्ध नागरिकही आपल्या निरोगी आरोग्यासाठी धावताहेत, कुणी सायकल चालवतोय तर कुणी शारीरिक व्यायाम करतोय असे चित्र रविवारी (दि़२३) पहाटे सुयोजित व्हेरिडियन रोडवर बघावयास मिळाले़ निमित्त होते पोलीस आयुक्तालयातर्फे विदेशातील हॅप्पी स्ट्रीटच्या धर्तीवर आयोजित ‘लास्ट सण्डे आॅफ द मन्थ रन’ या उपक्रमाचे़ विशेष म्हणजे सुटीचा दिवस असल्याने नाशिककर यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंघल यांनी विदेशातील हॅप्पी स्ट्रीटची संकल्पना विशद करताना सांगितले की, नाशिकमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्याबरोबरच पोलीस व नागरिकांमध्ये सुसंवाद निर्माण होण्यास मदत होईल़ तसेच सामाजिक सलोखा राखण्यासाठी उपयुक्त ठरेल असेही ते म्हणाले. यानंतर पोलीस आयुक्तांनी पाच किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेला गट, चिमुकल्यांचा गट तसेच तरुणांच्या गटाला हिरवा झेंडा दाखविला़ (प्रतिनिधी)
‘लास्ट सण्डे आॅफ द मन्थ रन’ ची मजा
By admin | Updated: October 24, 2016 00:57 IST