Enjoy the 71st anniversary of ST | एसटीचा ७१वा वर्धापनदिन उत्साहात

मनमाड बस आगारात परिवहन दिनानिमित्त आयोजत कार्यक्रमात उपस्थित शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास कांदे, प्रीतम लाडवंजारी, मयूर बोरसे, संतोष बळीद, विलास कटारे, महेंद्र गुरुड आदी.

ठळक मुद्देमनमाड : प्रवाशांचा केला सत्कार

मनमाड : प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद वाक्य घेतलेल्या एसटी महामंडळाचा ७१वा वर्धापनदिन मनमाड बस आगारात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे, शहरप्रमुख मयूर बोरसे, गटनेते गणेश धात्रक, संतोष बळीद, आगार व्यवस्थापक प्रीतम लाडवंजारी आदी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचे बस आगाराच्या वतीने स्वागत करण्यात आले. आगार व्यवस्थापक प्रीतम लाडवंजारी यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाचा हेतू
विशद केला. १ जून १९४८ रोजी सुरुवात झालेल्या एसटीने शहरासह ग्रामीण भागातील जनतेच्या जीवनात महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.
७१व्या वर्धापन दिनानिमित्त मनमाड बसस्थानकावरून बाहेरगावी जाणाऱ्या व येणाºया प्रवाशांना महामंडळाकडून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी प्रवाशांच्या सेवेबरोबरच पर्यावरणाच्या रक्षणासाठी हातभार लावावा, असे आवाहन सुहास कांदे यांनी केले.
बस डेपोमध्ये एसटी महामंडळाच्या लोगोची आकर्षक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. यावेळी नगरसेवक विलास कटारे, महेंद्र गरुड, विजय शेळके, शिलावट, घुगे, सोनवणे आदी उपस्थित होते.

Web Title: Enjoy the 71st anniversary of ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.