शहरात पावसाच्या दमदार सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:45 IST2017-09-11T00:45:10+5:302017-09-11T00:45:16+5:30
विश्रांतीनंतर पावसाने रविवारी (दि.१०) दमदार सलामी दिली. भाद्रपदचे ऊन तापू लागल्यामुळे वातावरणात उष्माही जाणवत होता. कमाल तपमानाने तिशी ओलांडली आहे. अशा वातावरणात पावसाने दुपारपासून शहरासह उपनगरीय परिसरात टप्प्याटप्प्याने दिलेल्या सलामीमुळे नाशिककरांना दिलासा मिळाला.

शहरात पावसाच्या दमदार सरी
नाशिक : विश्रांतीनंतर पावसाने रविवारी (दि.१०) दमदार सलामी दिली. भाद्रपदचे ऊन तापू लागल्यामुळे वातावरणात उष्माही जाणवत होता. कमाल तपमानाने तिशी ओलांडली आहे. अशा वातावरणात पावसाने दुपारपासून शहरासह उपनगरीय परिसरात टप्प्याटप्प्याने दिलेल्या सलामीमुळे नाशिककरांना दिलासा मिळाला.
गणेशोत्सवाच्या अखेरच्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. अधूनमधून पावसाची उपनगरीय परिसरात तुरळक हजेरी होती; मात्र शनिवारपासून पावसाने उपनगरीय परिसरात जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली. शनिवारी संध्याकाळी पावसाने वर्दी दिली. रविवारी दुपारी बारा वाजेपासूनच शहरात ढगाळ हवामान तयार झाले आणि थंड वाराही सुटला. क्षणार्धात टपोºया थेंबासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. पाथर्डी, वडाळागाव, अशोकामार्ग, डीजीपीनगर, भाभानगर, जुने नाशिकसह तिडके कॉलनी परिसरात मुसळधार पाऊस झाला; मात्र टिळकवाडी, शरणपूररोड, सीबीएस, पंचवटी, नाशिकरोड, मेरी, म्हसरूळ भागात कडक ऊन पडलेले होते. दुपारी तीन वाजेपासून पावसाला दमदार सुरुवात झाली. साडेचार वाजता पंचवटी परिसराला पावसाने झोडपले तर संध्याकाळी साडेपाच वाजेपासून सिडको, जेलरोडमध्येही पाऊस सुरू झाला.