इंग्रजी शाळांची बाजी

By Admin | Updated: May 27, 2016 00:33 IST2016-05-26T22:16:56+5:302016-05-27T00:33:56+5:30

बारावी निकाल : फ्रावशी, विस्डम, के. के. वाघचा शंभर टक्के निकाल

English school betting | इंग्रजी शाळांची बाजी

इंग्रजी शाळांची बाजी

 नाशिक : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी (दि.२५) निकाल जाहीर झाला. या परीक्षेत नाशिक विभागातील ८३.९९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, शहरातील फ्रावशी अकॅडमी व विस्डम हाय इंटरनॅशनल या कनिष्ठ महाविद्यालयांतील १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
एचएससी बोर्डाने आपल्या संकेतस्थळावर बारावीचा निकाल जाहीर केला. यात आर. एस. लथ एज्युकेशन ट्रस्टच्या फ्रावशी कनिष्ठ महाविद्यालयाने बारावीच्या परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. फ्रावशीच्या जय पटेल याने वाणिज्य शाखेत ९० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, तर दुसऱ्या स्थानी ८८.४६ टक्के गुण मिळविणारी आकांक्षा पंजवानी व झील शाह हिने ८६.७७ टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला. तर विज्ञान शाखेत चिराग पटेल ८७.०८ टक्के, हर्षद धोंगडे ८०.३१ टक्के, साक्षी गायकवाड ८० टक्के गुण मिळवून अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय स्थानावर राहिले, तर इंटरनॅशनल या कनिष्ठ महाविद्यालय व पुरिया पार्क येथील के. के. वाघ कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान आणि वाणिज्य शाखांचा तसेच सरस्वतीनगर येथील शाखेच्या वाणिज्य विभागातील १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. शहरातील इतरही विद्यालयांतील बहुतेक विद्यार्थी उत्कृष्ट गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांनी दिवसभरात सायबर कॅफे, मोबाइल, टॅब, लॅपटॉप व कॉम्प्युटरच्या मदतीने निकाल मिळवले. त्यामुळे निकालाच्या दिवशीही शहरातील बहुतेक सर्वच महाविद्यालय परिसरात सामसूम होती, तर महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचे सायंकाळी उशिरापर्यंत निकाल मिळविण्याचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)

Web Title: English school betting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.