अभियंत्यांनी उद्योजक बनावे
By Admin | Updated: October 12, 2016 22:21 IST2016-10-12T22:11:57+5:302016-10-12T22:21:44+5:30
डवले : वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात चर्चासत्र

अभियंत्यांनी उद्योजक बनावे
नाशिक : के. के. वाघ शिक्षण संस्था संचलित के. के. वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन महाविद्यालय आणि इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन कॉलेज चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने अभियंता सप्ताहानिमित्त चर्चासत्र संपन्न झाले. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त एकनाथ डवले व उद्योजक सल्लागार डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी उपस्थित होते.
के. के. वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन महाविद्यालयात बोलताना डवले यांनी स्टार्ट अप इंडिया व मेक इन इंडिया यातील फरक समजावून सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत साकार करण्यासाठी या उपक्रमाची गरज प्रतिपादन केली. याप्रसंगी आपल्या भाषणात नाशिकमधील उद्योजक सल्लागार डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी यांनी भारताचे महान अभियंता सर विश्वेश्वरैया यांच्या कार्याचा उल्लेख करून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी संस्थेच्या वतीने पीएच.डी.धारक, शोध निबंध सादर केलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, विश्वस्त चांगदेवराव होळकर, प्राचार्य डॉ. के. एन. नांदूरकर, संगणक विभागप्रमुख डॉ. एस. एस. साने व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा. ए. एस. पाटील यांनी करून दिली. सूत्रसंचालन प्रा. स्नेहल चौधरी व स्वाती पवार यांनी केले. डॉ. एस. आर. गांगुर्डे यांनी आभार प्रदर्शन केले.