अभियांत्रिकीचे ‘आॅप्शन’अर्ज सुरू

By Admin | Updated: July 14, 2014 00:27 IST2014-07-14T00:07:36+5:302014-07-14T00:27:51+5:30

अभियांत्रिकीचे ‘आॅप्शन’अर्ज सुरू

Engineering'Apotion 'is going on | अभियांत्रिकीचे ‘आॅप्शन’अर्ज सुरू

अभियांत्रिकीचे ‘आॅप्शन’अर्ज सुरू

नाशिक : प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेसाठी आॅप्शन अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर विद्यार्थी आता महाविद्यालय निवडीचे अर्ज दाखल करीत आहेत. येत्या मंगळवारपर्यंत विद्यार्थ्यांना आॅप्शन अर्ज भरण्यास मुदत देण्यात आली आहे.
गेल्या २३ जुलैपासून प्रथम वर्ष अभियांत्रिकीसाठी आॅनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला होता. अर्ज दाखल करण्याबरोबरच कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर गेल्या १० रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती. गुणवत्ता यादीत नावे जाहीर झाल्यानुसार आजपासून तीन दिवस आॅप्शन अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. शहरातील १४ एआरसी सेंटर्समधून आज सुमारे ७५० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले.
शहरात अभियांत्रिकी प्रवेशासाठीचे १४ एआरसी सेंटर्स आहेत. या सेंटर्सवर विद्यार्थ्यांना आॅप्शन अर्ज दाखल करण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे. त्यानुसार जवळपास सर्वच ठिकाणी असंख्य प्रवेश निश्चित झाले आहेत. विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या आॅप्शन अर्जानुसार विद्यार्थ्यांचा ज्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल त्या विद्यार्थ्याच्या नावाची आणि महाविद्यालयाच्या नावाची यादी येत्या १६ रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर तीन दिवस म्हणजेच १७ ते १९ पर्यंत विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागणार आहे. या प्रक्रियेनंतर शिल्लक राहणाऱ्या जागांसाठी पुन्हा दुसरा कॅप राउंड होणार असून, त्यासाठीची प्रक्रिया नंतर जाहीर केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना मागीलवर्षीच्या कट आॅफ लिस्टची संपूर्ण माहिती ‘डीटीए’च्या संकेतस्थळावर मिळणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Engineering'Apotion 'is going on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.