अभियांत्रिकीच्या निकालात घोळ?
By Admin | Updated: July 25, 2014 00:27 IST2014-07-24T23:52:11+5:302014-07-25T00:27:40+5:30
मनविसेचे निवेदन : विद्यार्थ्यांकडून तक्रारी

अभियांत्रिकीच्या निकालात घोळ?
नाशिक : पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१३-१४ च्या अभियांत्रिकी अभ्यासक्रम परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण दाखविण्यात आले आहे. दरम्यान, विद्यापीठाच्या चुकांमुळेच अशा प्रकारचा निकाल जाहीर केल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून केल्या जात असल्याने पेपरची पुनर्तपासणी केली जावी, या मागणीचे निवेदन मनविसेकडून देण्यात आले.
अभियांत्रिकी शाखेत निम्म्यापेक्षा अधिक विद्यार्थी अनुत्तीर्ण दाखविल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी याबाबत विद्यापीठाकडे तक्रारींचा पाऊस पाडला असून, पेपर पुनर्तपासणी करावी, अशी मागणी केली जात आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने पुणे विद्यापीठाचे विभागीय समन्वयक एस. जी. श्रीवास्तव यांची भेट घेऊन त्यांना पेपर पुनर्तपासणीची मागणी केली. मनविसेचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य गिते, राकेश परदेशी, वैभव वाळेकर, सचिन भाढे, गणेश मंडलिक, गौरव रामटेके, रवि जाधव, शुभम नागरे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)