सातपूरला इंजिनिअरची आत्महत्त्या
By Admin | Updated: March 3, 2015 00:31 IST2015-03-03T00:31:40+5:302015-03-03T00:31:52+5:30
सातपूरला इंजिनिअरची आत्महत्त्या

सातपूरला इंजिनिअरची आत्महत्त्या
नाशिक : नोकरीनिमित्त नाशकात आलेल्या झारखंडच्या युवकाने आयटीआय मैदानाजवळ बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या बीमला गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे़
झारखंडच्या पोकारू जिल्ह्यातील चास येथील रहिवासी पंकजकुमार महंतो (२३, कल्पतरू सोसायटी, महात्मानगर) हा युवक गेल्या काही दिवसांपासून सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत शिकाऊ इंजिनिअर म्हणून काम करीत होता़ या युवकाने रविवारी आयटीआय मैदानाजवळ बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये गळफास घेऊन आत्महत्त्या केली़
आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून, सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)