शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर पंचायत समितीचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2022 00:12 IST

सिन्नर : सिन्नर पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कंत्राटी कनिष्ठ अभियंता गौरव सूर्यकांत गवळी यांना शुक्रवारी (दि.७) सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

ठळक मुद्दे तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

सिन्नर : सिन्नर पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कंत्राटी कनिष्ठ अभियंता गौरव सूर्यकांत गवळी यांना शुक्रवारी (दि.७) सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.तक्रारदार हे ठेकेदार असून, त्यांनी सिन्नर तालुक्यातील कासारवाडी ग्रामपंचायतअंतर्गत पिण्याच्या पाण्यासाठी आर.ओ. प्लांट बसवण्याचे कंत्राट घेऊन सदरचे काम पूर्ण केले होते. सदर कामाची मोजमाप पुस्तिका भरून केलेल्या कामाचे देयक (बिल) काढून देण्यासाठी मदत करण्याकरिता कनिष्ठ अभियंता गवळी यांनी १५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात पंधरा हजारांपैकी पहिला टप्पा १० हजार रुपये लाच स्वीकारताना गवळी यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे, वाचक पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील, सापळा पथकातील पोलीस हवालदार सुखदेव मुरकुटे, पोलीस नाईक अजय गरुड, परशुराम जाधव आदींनी सापळा रचून कामगिरी यशस्वी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस