शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

मालेगाव बाह्य मतदार-संघात अभियंता-डॉक्टरमध्ये काट्याची टक्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 01:16 IST

मालेगाव बाह्य मतदार-संघात माघारीच्या दिवशी दोघा अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली असून, आता नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

मालेगाव : मालेगाव बाह्य मतदार-संघात माघारीच्या दिवशी दोघा अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली असून, आता नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यात ९ पैकी ६ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार तथा ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे (अभियंता) व कॉँग्रेस - राष्टवादी कॉँग्रेस व मित्रपक्षाचे उमेदवार तथा मविप्रचे अध्यक्ष तुषार शेवाळे (डॉक्टर) या दोघा उच्चशिक्षित व समाजाशी नाळ जुळलेल्या उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर होणार आहे.मालेगाव बाह्य मतदारसंघातून गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढलेले व यंदा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले संदीप पाटील यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. त्यांच्यासह मो. इस्माईल जुम्मन यांनी माघार घेतली आहे. परिणामी बाह्य मतदारसंघात ९ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यातील सहा उमेदवार सेनेचे भुसे व कॉँग्रेसचे शेवाळे यांना डोकेदुखी ठरणार आहे. बाह्य मतदारसंघात कॉँग्रेसकडून डॉ. तुषार शेवाळे व शिवसेनेकडून दादा भुसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या दोघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. २०१४ च्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेतर्फे दादा भुसे, भाजपचे पवन यशवंत ठाकरे, कॉँग्रेसचे डॉ. राजेंद्र ठाकरे, मनसेचे संदीप पाटील,बसपाचे व्यंकट कचवे तर अपक्ष म्हणून कैलास पवार, अ‍ॅड. चंद्रशेखर देवरे, निंबा माळी, फहीम अहमद महेमुदल हसन निवडणूक रिंगणात उतरले होते. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे दादा भुसे व भाजपचे पवन ठाकरे यांच्यात सरळ लढत झाली होती. दादा भुसे यांना ८२ हजार ९३ मते मिळाली होती तर भाजपचे ठाकरे यांना ४४ हजार ६७२ मते मिळाली होती. राष्टÑवादी कॉँग्रेसचे सुनील गायकवाड यांना ३४ हजार ११७ मते मिळाली होती. या चुरशीच्या लढतीत भुसे यांनी मताधिक्य खेचत विजयाची हॅट्ट्रिक केली होती.यंदाच्या निवडणुकीत कॉँग्रेसचे डॉ. तुषार शेवाळे व शिवसेनेचे दादा भुसे यांच्यात जोरदार लढत होणार आहे. डॉक्टर व अभियंत्यामध्ये सरळ सामना होणार असल्याने जिल्ह्याचे लक्ष मालेगाव बाह्य मतदारसंघाकडे लागून आहे.मालेगाव बाह्य मतदारसंघात ३ लाख ३९ हजार ७१ मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ७८ हजार ५५४ पुरुष तर १ लाख ६० हजार ५१४ महिला मतदार आहेत.३ तृतीय पंथी मतदारांचा समावेश आहे. २०१४च्या निवडणुकीत ३ लाख ३६ हजार १९७ मतदार होते. त्यात १ लाख ७७ हजार ४४९ पुरुष, तर १ लाख ५८ हजार ७४७ महिला मतदारांचा समावेश होता. गेल्या वेळी ५२ टक्के मतदार झाले होते.रिंगणातील उमेदवार...दादा भुसे (शिवसेना), डॉ. तुषार शेवाळे (काँग्रेस), आनंद लक्ष्मण आढाव (बसपा), अबु गफार मो. इस्माईल (अपक्ष), अब्दुरशीद मुह इजहार (अपक्ष), कमालुद्दीन रियासतअली (अपक्ष), काशीनाथ लखा सोनवणे (अपक्ष), प्रशांत अशोक जाधव (अपक्ष), मच्छिंद्र गोविंद शिर्के (अपक्ष).२०१४ मध्ये होते ९ उमेदवार । यंदा आहेत एकूण ९ उमेदवार

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019malegaon-outer-acमालेगाव बाह्य