इंजिनात बिघाड
By Admin | Updated: July 20, 2016 23:56 IST2016-07-20T23:54:10+5:302016-07-20T23:56:36+5:30
पंचवटी एक्स्प्रेस : चाकरमान्यांचे हाल

इंजिनात बिघाड
इगतपुरी : मनमाड - मुंबई पंचवटी एक्स्प्रेसच्या इंजिनात नाशिकजवळील खेरवाडी येथे बिघाड झाल्यामुळे जिल्ह्यासह इगतपुरी तालुक्यातील चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. जवळपास एक ते दीड तास नाशिक हून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या उशिरा धावत होत्या.
नेहमीप्रमाणे ८ वाजता इगतपुरी स्थानकात येणारी पंचवटी एक्स्प्रेसला उशीर झाल्याने चाकरमान्यांचे हाल झाले. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला. (वार्ताहर)४इगतपुरी रेल्वेस्थानकात चाकरमान्यांचे हाल झाले. मनस्ताप वाढला होता. काही प्रवाशांनी तर इगतपुरी येथून कसारा स्टेशन गाठत पुढील प्रवास लोकलने केला. यामुळे पंचवटी एक्स्प्रेस इगतपुरी रेल्वेस्थानकात एक ते दीड तास उशिराने आली. नागपूर एक्स्प्रेस, गोदावरी एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस, जनता एक्स्प्रेस याही गाड्या एक ते दीड तास उशिराने धावत होत्या.