प्रचार संपुष्टात; आज साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 06:24 IST2018-06-24T06:24:43+5:302018-06-24T06:24:45+5:30
विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा जाहीर प्रचार शनिवारी सायंकाळी पाच वाजता संपुष्टात आला

प्रचार संपुष्टात; आज साहित्याचे वाटप
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा जाहीर प्रचार शनिवारी सायंकाळी पाच वाजता संपुष्टात आला असून, उमेदवारांच्या प्रचारार्थ ठिकठिकाणी सुरू केलेल्या संपर्क कार्यालयाबाहेर लावलेले प्रचारफलक काढून घेण्यात आले. सोमवारी या निवडणुकीसाठी नाशिक विभागात मतदान घेण्यात येणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर रविवारी प्रत्येक जिल्'ातील जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान कर्मचारी व अधिकाऱ्यांना साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
सोमवारी होणाºया मतदानाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. विभागातील मतदारांसाठी ९४ मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्यासाठी कर्मचारी, अधिकाºयांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदान कर्मचाºयांना यापूर्वीच प्रशिक्षण देण्यात आले असून, मतपत्रिकेद्वारे पसंतीक्रमाने उमेदवार निवडून द्यायचे असल्याने मतपत्रिका, मतपेट्या आदी ४३ प्रकारच्या साहित्याचे वाटप रविवारी सकाळी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात येईल व या साहित्यानिशी कर्मचारी, अधिकारी थेट मतदान केंद्रावर रवाना होणार आहेत. निवडणुकीच्या जाहीर प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शनिवारी उमेदवारांनी प्रत्येक जिल्'ात धावत्या भेटी देऊन निवडणूक प्रतिनिधी व प्रचाराचा धावता आढावा घेतला.