कोमल नागरेचेही आव्हान संपुष्टात
By Admin | Updated: May 12, 2015 00:50 IST2015-05-12T00:49:22+5:302015-05-12T00:50:03+5:30
कोमल नागरेचेही आव्हान संपुष्टात

कोमल नागरेचेही आव्हान संपुष्टात
नाशिक : उत्तर महाराष्ट्रात प्रथमच आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या (आय. टी. एफ.) अधिकृत मान्यतेने दहा हजार डॉलर्स बक्षिसांची रक्कम असलेली स्पर्धा निवेक नाशिक येथे उत्साहात सुरू असून, आज झालेल्या मुख्य फेरीच्या सामन्यामध्ये वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळालेल्या नाशिकच्या कोमल नागरेला शरोन पौल हिने ६-०, ६-०ने सहज पराभूत केल्याने तिचे आव्हान संपुष्टात आले. उर्वरित सामन्यात सिहिका सुन्कारा हिने अक्षरा इसका हिचा ६-३,६-४ असा पराभव केला, तर स्नेहदेवी रेड्डीने अर्थी मुनियनचा ६-१, ६-० असा पराभव केला. वंशिका साव्ह्नेय आणि साई साम्हिथा चामार्थी यांच्यात झालेला अत्यंत चुरशीच्या सामन्यात साई साम्हिथा चामार्थी हिने ७-५,१-६,६-३, असे गुण मिळवीत विजय संपादन केला. हा सामना जवळपास साडेतीन तास चालला. नाशिकमध्ये वाढलेले तपमान खेळाडूंची चांगलीच परीक्षा घेत आहे. दुपारच्या सत्रात झालेल्या सामन्यात रिया भाटिया हिने सोह सादिक हीच ६-१.६-०, तर भुवन कळवा हिने नंदिनी शर्मा हीच ६-३.६-३, कर्माण कौर थंडीने प्रिती उज्जीनीचा ६-०,६-० असा पराभव केला आजच्या सामन्यात विजयी झालेले खेळाडू उद्या होणाऱ्या दुसऱ्या फेरीचे सामने खेळतील. मुख्य फेरीच्या व दुहेरीच्या सामन्याची सुरु वात आयमाचे माजी अध्यक्ष जे. एम. पवार आणि बी. पी. सोनार यांच्या हस्ते नाणेफेक करून करण्यात आली. यावेळी स्पर्धा निरीक्षक नितीन कन्नमवार, स्पर्धा संचालक राकेश पाटील, निवेकचे माजी अध्यक्ष रमेश वैश्य, निवेकचे अध्यक्ष संदीप सोनार, उपाध्यक्ष मंगेश पाटणकर, सचिव राजकुमार जॉली, क्र ीडा सचिव संदीप गोयल, स्पर्धा समन्वयक रणजित सिंग कोशाध्यक्ष आशिष महेशिन्का, अरु ण अहेर, आशिष अरोरा, प्रशांत साठे, संजय नागरे, श्रीकांत कुमावत, पंकज खत्री, हेमंत कपाडिया, अशोक हेम्बार्डे आदि उपस्थित होते.