शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वर्षाअखेर मुकणे धरणाचे पाणी पोहोचणार नाशकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 15:01 IST

हेडवर्क्सची कामे सुरू : कंपनीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता

ठळक मुद्देमहापालिकेमार्फत जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत मुकणे धरण पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून, आतापर्यंत ७० टक्के कामपाणीसाठ्यामुळे धरण जलाशयातील हेडवर्क्सची कामे बंद पडलेली होती

नाशिक : महापालिकेमार्फत जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत मुकणे धरण पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून, आतापर्यंत ७० टक्के काम झाले आहे. परंतु, पाणीसाठ्यामुळे धरण जलाशयातील हेडवर्क्सची कामे बंद पडलेली होती. गेल्या २८ फेबु्रवारीला मुकणे धरणातून आवर्तन सोडण्यात आल्याने पाणीसाठा ३८ टक्क्यांवर आला असून त्यामुळे हेडवर्क्सच्या कामाला सुरुवात झाली आहे. पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेणा-या एल अ‍ॅण्ड टी कंपनीला जुलै २०१८ अखेर काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली आहे परंतु, पाणीसाठ्यामुळे कामात खोळंबा झाल्याने कंपनीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता असून डिसेंबर २०१८ अखेर मुकणेचे पाणी नाशिकला आणण्याचे नियोजन केले जात आहे.मुकणे धरणातून थेट पाईपलाईनद्वारे नाशिकला पाणीपुरवठा करण्याची योजना असून त्यासाठी सुमारे २६५ कोटी रुपयांचे कंत्राट एल अ‍ॅण्ड टी कंपनीला देण्यात आलेले आहे. परंतु, मुकणे धरणातील हेडवर्क्सची कामे पूर्ण करण्यातच कंपनीला अडचणी निर्माण होत आहे. मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे मुकणे धरणात सुमारे ९५ टक्के जलसाठा तयार झाला. मागील १० वर्षांत धरण एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच भरले होते. त्यामुळे धरणातील जलाशयातील हेडवर्क्सची कामे बंद झालेली होती. हेडवर्क्सचे काम ५८ टक्के इतकेच झालेले आहे. धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याशिवाय कॉफर डॅमसह अन्य तांत्रिक स्वरूपातील कामे करणे अशक्य होऊन बसले. महापालिकेचे माजी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी मुकणे पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केली असता, धरणातील पाणीसाठा कमी होण्यासाठी लवकरात लवकर पाण्याची आवर्तने सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले होते. परंतु, कालबद्ध कार्यक्रमानुसारच आवर्तने होतील, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले होते. त्यानुसार, गेल्या २८ फेबु्रवारीला पाण्याचे आवर्तन करण्यात आले आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा आता ३८ टक्क्यांवर आला असून त्यामुळे हेडवर्क्सची कामे करण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार, कंपनीने गेल्या आठ-दहा दिवसांपासून पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाDamधरण