मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात दोनवर्षीय बालकाचा अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:33 IST2017-09-21T00:33:13+5:302017-09-21T00:33:18+5:30
पेठ : तालुक्यातील बेहेडमाळ येथील शेतमजूर दीक्षी, ता. निफाड येथे मजुरीसाठी वास्तव्यास असताना बुधवारी (दि. २१) दुपारी त्यांच्या दोन वर्षाच्या बालकाचा मोकाट कुत्र्यांच्या कळपाने अक्षरश: फडशा पाडल्याची घटना घडली.

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात दोनवर्षीय बालकाचा अंत
पेठ : तालुक्यातील बेहेडमाळ येथील शेतमजूर दीक्षी, ता. निफाड येथे मजुरीसाठी वास्तव्यास असताना बुधवारी (दि. २१) दुपारी त्यांच्या दोन वर्षाच्या बालकाचा मोकाट कुत्र्यांच्या कळपाने अक्षरश: फडशा पाडल्याची घटना घडली.
बेहेडमाळ, ता. पेठ येथील दशरथ तुकाराम प्रधान हे आपल्या पत्नीसह निफाड तालुक्यातील दीक्षी येथील मोईद्दिन शेख यांच्या द्राक्षबागेत कामाला होते. त्यांचा दोन वर्षाचा मुलगा देवीदास हा आई-वडिलांसमवेत शेतातील रस्त्यालगत खेळत असताना सात-आठ मोकाट कुत्र्यांनी देवीदासवर हल्ला चढवत त्याला फरपटत द्राक्षबागेत नेले. इतर कुत्र्यांनी अतिशय निर्दयीपणे देवीदासला अक्षरश: फाडून खाल्ले.
सदरची बाब शेतात काम करणाºया आईवडिलांसह इतर शेतमजुरांच्या लक्षात आल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली; मात्र तोपर्यंत या बालकाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. घाबरलेल्या नातेवाइकांनी बाळाला घेऊन बेहेडमाळ गाठले. मयत देवीदासला आई, वडील, आजी, आजोबा व चार बहिणी आहेत. या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.पेठ येथे मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. रस्त्याने येणाºया जाणाºया नागरिकांवर कुत्रे धावून जात असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.