..अखेर सिन्नरला पावसाने शंभरी गाठली
By Admin | Updated: July 30, 2014 00:20 IST2014-07-29T23:31:57+5:302014-07-30T00:20:19+5:30
सलग दुसऱ्या वर्षीही दुष्काळी म्हणून जाहीर झालेल्या सिन्नर तालुक्यात निम्मा पावसाळा संपत आला असताना पर्जन्यमापकाने आत्ताशी शंभरी गाठली आहे.

..अखेर सिन्नरला पावसाने शंभरी गाठली
सलग दुसऱ्या वर्षीही दुष्काळी म्हणून जाहीर झालेल्या सिन्नर तालुक्यात निम्मा पावसाळा संपत आला असताना पर्जन्यमापकाने आत्ताशी शंभरी गाठली आहे. सिन्नर तालुक्याच्याचे सरासरी पर्जन्यमान ५५६ मिमी आहे. यावर्षी निम्मा पावसाळा संपत आला असताना पर्जन्यमापकात केवळ ११९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सिन्नर शहरासह तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसापासून पावसाची रिमझिम सुरू आहे. तालुक्यात अद्याप जोरदार पाऊस नसल्याने बंधारे, नदी-नाले कोरडेठाक आहेत. तालुकाभर अद्याप खरिपाच्या म्हणाव्या त्या प्रमाणात पेरण्या झालेल्या नाही. या रिमझिम पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.