शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘शेल्टर एक्स्पो’चा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 01:20 IST

शहरात गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या शेल्टर प्रदर्शनाला नाशिक शहर व जिल्ह्यासह संपूर्ण उत्तरमहाराष्ट्र व मुंबई पुण्यातील सुमारे साठ हजारहून अधिक नागरिकांनी हजेरी लावून आपल्या स्वप्नातील घराच्या विविध पर्यांची चाचपणी केली. तर सुमारे पाचशे ग्राकांनी शेल्टरच्या माध्यमातून आपले घर घेण्याचे स्वप्न पूर्ण केले.

ठळक मुद्देदीडशे कोटींची उलाढाल : पाचशे सदनिकांची विक्री; हजारो नागरिकांची भेट

नाशिक : शहरात गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या शेल्टर प्रदर्शनाला नाशिक शहर व जिल्ह्यासह संपूर्ण उत्तरमहाराष्ट्र व मुंबई पुण्यातील सुमारे साठ हजारहून अधिक नागरिकांनी हजेरी लावून आपल्या स्वप्नातील घराच्या विविध पर्यांची चाचपणी केली. तर सुमारे पाचशे ग्राकांनी शेल्टरच्या माध्यमातून आपले घर घेण्याचे स्वप्न पूर्ण केले. या चार दिवसांच्या कालावधीत शेल्टरमध्ये सुमारे दिडशे कोटींची उलाढाल झाली असून शेल्टरमधून विविध गृहप्रकल्पांची पाहणी करणाऱ्या ग्राहकांकडून शहरातील नाशिकमध्ये घर खरेदीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार असल्याने येत्या तीन महिन्यात तीन हजारहून अधिक सदनिकांची विक्री होईल असा विश्वास क्रेडाईन नाशिक मेट्रोचे अध्यक्ष उमेश वानखेडे यांनी व्यक्त केला आहे.शहरातील डोंगरे वस्तीगृह मैदानावर गेल्या चार दिवसांपासून सुरू दिमाखदार ‘शेल्टर २०१९ प्रॉपर्टी एक्स्पो’ चा रविवारी (दि.२२) समारोप झाला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह खासदार हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार, उपमहापौर भिकूबाई बागुल, आमदार प्रा. देवयानी फरांदे, अ‍ॅड. राहुल ढिकले, माजी खासदार प्रतापदादा सोनावणे, क्रेडाईचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष अनंत राजेगावकर, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष राजीव पारीख, नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉपोर्रेशनचे संचालक जितुभाई ठक्कर, क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव सुनील कोतवाल, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष उमेश वानखेडे, प्रदर्शनाचे समन्वयक रवि महाजन व सहसमन्वयक कृणाल पाटील उपस्थित होते. वैभवशाली वारसा लाभलेल्या नाशिक शहराची कनेक्टीव्हिटी वाढली असून शहराच्या विकासासाठी तसेच ब्रांन्डींगसाठी नाशिककर जनता, उद्योजक व लोकप्रतिनिधी एकत्र आल्यास निश्चित उद्दिष्ट साधता येईल. त्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी शहराच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याची अशी ग्वाही समारोप सोहळ््यासाठी उपस्थित लोकप्रतीनिधींनी यावेळी आयोजकांना दिली. त्याचप्रमाणे क्रेडाई खºया अर्थाने नाशिक शहराच्या ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर म्हणून काम करीत असल्याचेही लोकप्रतिनिधींनी नमूद केले. ‘शेल्टर २०१९ प्रॉपर्टी एक्स्पो’च्या संयोजन समितीचे अनिल आहेर, अतुल शिंदे, हितेश पोतदार, ऋषिकेश कोते, नरेंद्र कुलकर्णी, राजेश आहेर, सचिन चव्हाण, अंजन भलोदिया, गौरव ठक्कर, राजेश पिंगळे, भाग्यश्री तलवारे, शुभम राजेगावकर, श्रेणिक सुराणा, मनोज खिंवसरा आदी सदस्यांनी शेल्टर प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. उपस्थितांचे शेल्टरचे सहसमन्वयक कृणाल पाटील यांनी आभार मानले.अर्थकारणात सकारात्मक बदलक्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष उमेश वानखेडे यांनी नाशिक शहरांसाठी विमानसेवा, टायर बेस मेट्रो, युनिफाईड डीसीपीआर यांच्या पूर्ततेकडेही उपस्थित लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधतानाच शहर हीच आमची प्राथमिकता आहे असेही त्यांनी नमूद केले. त्र्यंबकेश्वर विकास, रामायण सर्किट अशा अनेक विकासाच्या योजनाही प्रस्तावित असून स्वच्छ हवामानाच्या नाशिककडे सर्वांचेचे लक्ष असल्याने तसेच शेल्टरच्या यशामुळे शहराचा अर्थकारणात सकारात्मक बदल होईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Nashikनाशिकbusinessव्यवसायHemant Godseहेमंत गोडसे