शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नैराश्यातून वर्षभरात २७६ जणांकडून आयुष्याचा शेवट

By विजय मोरे | Updated: January 12, 2019 00:25 IST

नाशिक : आर्थिक प्रश्न, कौटुंबिक तंटे, नोकरी- व्यवसायातील ताणतणाव, शारीरिक व्याधी व क्षणभराचा संताप या प्रमुख कारणांमुळे नैराश्याच्या गर्तेत ...

ठळक मुद्देपुरुषांचे प्रमाण अधिक : गळफास, विषारी औषधांचे सेवन;समुपदेशनाची आवश्यकता

नाशिक : आर्थिक प्रश्न, कौटुंबिक तंटे, नोकरी- व्यवसायातील ताणतणाव, शारीरिक व्याधी व क्षणभराचा संताप या प्रमुख कारणांमुळे नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या शहरातील २७६ नागरिकांनी जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षात आत्महत्येचा मार्ग पत्करून जीवन संपविल्याचे वास्तव समोर आले आहे़ विशेष म्हणजे आत्महत्या करणाऱ्यांमध्ये १८५ पुरुष तर ९२ स्त्रियांचा समावेश आहे़ नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे़शहरातील प्रत्येक नागरिकाच्या भौतिक सुख-सुविधांबाबत अपेक्षा वाढलेल्या आहेत़ तर दुसरीकडे नोकरी, व्यवसाय वा उद्योग करताना बहुतांशी सर्वसामान्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो़ याचा परिणाम कौटुंबिक जीवन, नातेसंबंध व स्वास्थ्यावर होतो़ नोकरी, व्यवसायात अहोरात्र मेहनत घेऊनही अपेक्षापूर्ती न झाल्यास नैराश्येत सापडून आत्महत्येचा मार्ग जवळ करीत आहेत़ गळफास, विषारी औषध, विहिरी, नदीच्या पात्रात उडी, स्वत:ला जाळून घेणे, इमारतीवरून उडी मारून वा रेल्वे या मार्गांचा आत्महत्येसाठी सर्रास वापर केला जात असल्याचे समोर आले आहे़शहरातील १९९ आत्महत्या या गळफास, ५९ विषारी औषध सेवनाने तर १८ जणांनी पाण्यात जीव देऊन आत्महत्या केली आहे़ सिडको परिसराचा अंतर्भाव असलेले अंबड पोलीस ठाणे, नाशिकरोड व पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत सर्वाधिक आत्महत्येच्या घटना घडलेल्या आहेत़ यामध्ये अल्पवयीन मुलांसह वयोवृद्धांचाही समावेश आहे.काही आत्महत्या या केवळक्षणिक संतापातून झालेल्याआहेत़

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी