होमगार्ड््सची चळवळ संपणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:46 IST2017-08-05T00:46:31+5:302017-08-05T00:46:47+5:30
पोलिसांच्या बरोबरीने आणि खांद्याला खांदा लावून काम करणारा वर्ग होमगार्ड होय. परंतु गेल्या काही वर्षांत शासनाचे बदललेले धोरण आणि प्रशासकीय अधिकाºयांची मनमानी यामुळे होमगार्ड चळवळ मोडीत निघते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

होमगार्ड््सची चळवळ संपणार?
नाशिक :पोलिसांच्या बरोबरीने आणि खांद्याला खांदा लावून काम करणारा वर्ग होमगार्ड होय. परंतु गेल्या काही वर्षांत शासनाचे बदललेले धोरण आणि प्रशासकीय अधिकाºयांची मनमानी यामुळे होमगार्ड चळवळ मोडीत निघते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. सॉफ्ट पोलीसिंगसाठी वापरण्यात येणाºया होमगार्डला मिळणारे अपुरे मानधन आणि कर्तव्याची संधी या बाबी दूरच, परंतु अनेक वर्षांपासून निष्काम सेवा करणाºया होमगार्ड्सची सेवाच नाकारण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात जाणीपूर्वक निर्माण करण्यात आलेल्या या होमगार्डची अवस्था बिकट होत आहे. अनेक राज्यांत होमगार्डचे महत्त्व वाढत असून, त्यांना अन्य सुविधा दिल्या जात असताना महाराष्टÑात मात्र ही चळवळच मोडीत निघते की काय, अशी भीती निर्माण झाली असल्याच्या भावना या चळवळीत अनेक वर्षे काम करणाºया होमगार्ड्सनी व्यक्त केल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी सण, उत्सव किंवा निवडणुकीत पोलिसांच्या बरोबरीने काम करणारे हे होमगार्ड्स सध्या अनेक समस्यांनी ग्रस्त असून, गेल्या काही वर्षांत सरकारचे त्यांच्याकडे इतके दुर्लक्ष झाले की जोखमीचे काम करून विमा संरक्षण नाही की वैद्यकीय विमा! अगदी रेनकोट, बूट यांसारख्याही वस्तू दिल्या जात नसल्याने निष्काम सेवा तरी कशी करावी, अशी भावना संबंधितांमध्ये निर्माण झाली आहे. परंतु अशा स्थितीत काम करतानाही आता अनेक वर्षे काम करणारे होमगाडर््स कमी केले जात आहे. सात राज्यांमध्ये होमगार्ड्सला नियमित काम आणि काही ठिकाणी राज्य सरकारच्या सेवेप्रमाणे मानधन दिले जात असताना महाराष्टÑात मात्र वय आणि अन्य निकष लावून होमगार्डचे नूतनीकरण करण्याऐवजी अपात्र ठरवले जात आहे. पोलिसांच्या सेवेसारखे नियम, परंतु अवघ्या चारशे रुपयांच्या मानधनावर काम करणाºया या होमगाडर््सना मिळणाºया सापत्नभावाविषयी होमगार्ड्समध्ये नाराजी असल्याचे ‘लोकमत’च्या व्यासपीठावर घेण्यात आलेल्या चर्चेत दिसून आले. होमगार्ड समस्यांसदर्भात झालेल्या विचार विमर्शमध्ये नितीन गुणवंत, रवींद्र साळुंके, दीपक उगले, संजय जगताप, प्रकाश आडके, बायना जगताप, अनिता जाधव, अनिता पांडे, प्रकाश लहेरे, दीपक गोडसे यांनी सहभाग घेतला.