राष्ट्रवादीतर्फे सरकारची अंत्ययात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:30 IST2017-09-26T23:14:57+5:302017-09-27T00:30:46+5:30
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढत थेट येथील तहसीलदार कार्यालयावर मंगळवारी सकाळी मोर्चा काढण्यात आला. तहसीलदारांना शेतकºयांच्या विविध मागण्यांचे तसेच पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसचे वाढलेले दर कमी करावे यासाठी निवेदन देण्यात आले.

राष्ट्रवादीतर्फे सरकारची अंत्ययात्रा
त्र्यंबकेश्वर : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढत थेट येथील तहसीलदार कार्यालयावर मंगळवारी सकाळी मोर्चा काढण्यात आला. तहसीलदारांना शेतकºयांच्या विविध मागण्यांचे तसेच पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसचे वाढलेले दर कमी करावे यासाठी निवेदन देण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असल्याने थेट आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी भाजपा-शिवसेना युती सरकारने शेतकºयांना वाºयावर सोडले आहे. त्यामुळे शेतकºयांना दिलासा देण्यासाठी व चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी तालुकावार जाऊन शेतकºयांशी चर्चा करत आहेत. त्यासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकºयांशी संवाद साधताना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार बोलत होते. यावेळी विष्णुपंत म्हैसधुणे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, बहिरू मुळाणे, मनोज काण्णव, अरुण मेढे, राजेंद्र जाधव, खेमराज कोर, यशवंत शिरसाठ आदींची भाषणे झाली. यावेळी कैलास मोरे, स्वप्निल बागडे, विजय गांगुर्डे, दादासाहेब पन्हाळे, दिलीप पवार उपस्थित होते.