निवडणूक संपताच ‘तुझ्या गळा, माझ्या गळा’
By Admin | Updated: March 1, 2017 01:03 IST2017-03-01T01:03:38+5:302017-03-01T01:03:50+5:30
नाशिक : भाजपातील गुन्हेगारी, मनसेची निष्क्रियता, कॉँग्रेस - राष्ट्रवादीचे घोटाळा अशा विविध प्रकारचे आरोप- प्रत्यारोप करणाऱ्या सर्वच पक्षांचे प्रतिनिधींनी निवडणूक संपताच एकीचा सूर आळवला आहे.

निवडणूक संपताच ‘तुझ्या गळा, माझ्या गळा’
नाशिक : भाजपातील गुन्हेगारी, तिकीट विक्री, मनसेची निष्क्रियता, कॉँग्रेस - राष्ट्रवादीचे राज्यस्तरीय घोटाळा अशा विविध प्रकारचे आरोप- प्रत्यारोप करणाऱ्या सर्वच पक्षांचे प्रतिनिधींनी निवडणूक संपताच एकीचा सूर आळवला आहे. ‘तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू ऐक्याच्या माळा’ हे त्यांचे गीत ऐकून सारेच अवाक्् झाले. आता सर्वांनीच शहर विकासाचा गाडा एकोप्याने पुढे न्यावा, असे भावनिक आवाहन करण्यात आले. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर अखेरची महासभा मावळते महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सर्वच पक्षांना प्रेमाचा पान्हा फुटलेला पहायला मिळाला. शिवसेनेचे नगरसेवक विनायक पांडे यांनी महापौर अशोक मुर्तडक यांचे कौतुक करतानाच त्यांच्या कारकिर्दीत सिंहस्थ आणि विकासाची कामे कशा पद्धतीने झाली याचे वर्णन केले. प्रकाश लोंढे यांनी भावनिक भाषण केले, तर संभाजी मोरुस्कर यांनी आपण यापूर्वी भाजपाविरुद्ध सर्व, असे वातावरण होते. आज असे काहीच उरले नाही, असे नमूद केले.गेल्या वीस वर्षांपासून नगरसेवक असलेले भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनीदेखील आता आपण सभागृहात राहणार नाही. मी मोठ्या पदावर गेलो, परंतु या सभागृहानेच मोठे केले, असे आवर्जून सांगितले. महापौरपदाच्या कालावधीतही आपण गट-तट ठेवले नव्हते सिंहस्थासाठी जागा आरक्षणाचा ठराव केला, अशी स्मृती जागृत करताना यंदाच्या सिंहस्थासाठी महापौरांना घेऊन आपण पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे जाऊन कसे प्रयत्न केले याचे वर्णनही त्यांनी केले.