शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकांसाठी ‘आॅन डिमांड एक्झाम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:29 IST

मुक्त शिक्षणाची संधी देणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाने सेनादलातील महाराष्टÑातील जवानांना शिक्षण पूर्ण करण्याची संधी देतानाच त्यांना त्यांच्या सोयीच्या कालावधीनुसार परीक्षा देण्याचा महत्त्वपूर्ण करार केला आहे. ‘आॅन डिमांड एक्झाम’ अशी व्यवस्था विद्यापीठाने केली असून, आगामी वर्षापासून या सुविधेचा लाभ सैनिकांना घेता येणार असल्याची माहिती मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. ई. वायुनंदन यांनी दिली.

नाशिक : मुक्त शिक्षणाची संधी देणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाने सेनादलातील महाराष्टÑातील जवानांना शिक्षण पूर्ण करण्याची संधी देतानाच त्यांना त्यांच्या सोयीच्या कालावधीनुसार परीक्षा देण्याचा महत्त्वपूर्ण करार केला आहे. ‘आॅन डिमांड एक्झाम’ अशी व्यवस्था विद्यापीठाने केली असून, आगामी वर्षापासून या सुविधेचा लाभ सैनिकांना घेता येणार असल्याची माहिती मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. ई. वायुनंदन यांनी दिली.  मुक्त विद्यापीठाच्या वतीने लष्करी जवान आणि पोलिसांना शिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून देतानाच त्यांना सोयीचे ठरले असे निर्णय घेतले आहेत. महाराष्टÑ पोलिसांसाठी इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच परीक्षेचे वेळापत्रक असणार आहे, तर सैनिकांना मात्र अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्यांच्या सवडीनुसार परीक्षा देण्याची योजना आखण्यात आली आहे. महाराष्टÑातील सैनिकांना देशभर कुठेही सेवा करावी लागते. हे जवान जेव्हा सुटीवर आपल्या गावी येतात तेव्हा त्यांनी मागणी केल्यास त्यांच्यासाठी विशेष परीक्षा घेतली जाणार आहे. बीए, बीकॉमसह अन्य अभ्यासक्रम पूर्ण करणाºया सैनिकी विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आॅनलाइन पद्धतीने सदर परीक्षा घेतली जाणार असल्याने महाराष्टÑातील कुठल्याही केंद्रातून जवान आपली परीक्षा देऊ शकणार आहे.  मुक्त विद्यापीठात अनेक नामवंत साहित्यिकांचे अध्यासने आहेत. या अध्यासनांच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. आता या साहित्यिकांच्या नावाने राबविण्यात येणाºया विविध उपक्रमांचा भाग म्हणून विद्यापीठाच्याच आॅडिओ व्हिज्युअल विभागाच्या माध्यमातून २० मिनिटांचा माहितीपट बनविण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. यामुळे अद्ययावत आणि प्रशस्त अशा आॅडिओ व्हिज्युअल विभागाची उपयुक्तता यामुळे वाढणार आहे. विद्यापीठाच्या विविध प्रसारणाची कामे या विभागाच्या माध्यमातून कशी करता येतील याबाबतची चाचपणीदेखील केली जात आहे. यासाठी अद्ययावत सॅटेलाइटसाठीचा करार देखील केला जाणार  आहे. विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून कृषी संशोधन आणि प्रयोग केले जातात. याबाबत परिसरातील शेतकºयांना कृषी संशोधनाची माहिती देण्यासाठी ‘कृषिदूत’ निर्माण केले जाणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणदेखील दिले जाणार आहे.आधुनिक शेतीचे प्रशिक्षणविद्यापीठात पाणी आणि माती परिक्षणाच्या अद्ययावत प्रयोगशाळा, फायटो डायग्नोस्टिक्स, पोस्ट हार्वेस्ट टेक प्रयोगशाळा आहेत. त्याचा वापर वाढविण्याबरोबरच विविध प्रकारचे वाण विकसित करण्याचे प्रयोग येथे सातत्याने केले जातात. त्याची यशोगाथा समाजासमोर येण्यासाठी देखील नियोजन करण्यात येणार असल्याचे कुलगुरुंनी सांगितले. कृषी तंत्रज्ञान केंद्र सर्वसामान्यांसाठी खुले करण्याबाबत किंवा शेतकरीभिमुख होण्यासाठीचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या आवारात असलेल्या विस्तीर्ण वनराईत अनेक प्रकारची फळझाडे असून, त्यांच्या माध्यमातूनही विद्यापीठाला उत्पन्नाचा स्रोत निर्माण झालेला आहे. येथील कर्मचाºयांनाही येथील नैसर्गिक शेतीच्या फळांचा आनंद घेता येतो. आंबा, फणस, नारळ यासारखे उत्पादन येथे घेतले जाते. विद्यापीठाने दोन गावे दत्तक घेतली असून, या योजनेद्वारे आधुनिक शेतीचे प्रशिक्षण दिले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :universityविद्यापीठ