..अखेर टाकळी विंचूर चारीला आले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2016 23:54 IST2016-04-01T23:44:16+5:302016-04-01T23:54:06+5:30

..अखेर टाकळी विंचूर चारीला आले पाणी

At the end of the day, water came in the water of the tinker | ..अखेर टाकळी विंचूर चारीला आले पाणी

..अखेर टाकळी विंचूर चारीला आले पाणी

लासलगाव : ओझरखेड कालव्याचे शेवटचे गाव असलेल्या टाकळी विंचूर येथे पाणी न पोहोचल्याने संतप्त ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइल आंदोलन केले होते. ओझरखेड कालव्याचे उपकार्यकारी अभियंता राजेंद्र दिंडे यांनी
दुपारी १२ वाजता तातडीने आंदोलनस्थळी भेट देऊन २४ तासात पाणी मिळेल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार शुक्रवारी (दि. १) दुपारी टाकळी विंचूर चारीस पाणी आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
ओझरखेड कालव्याच्या अधिकाऱ्यांशी फोन करून झालेल्या चर्चेत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त ग्रामस्थांनी शोले स्टाइलने आंदोलन करत अधिकाऱ्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. ओझरखेड कालव्याचे उपकार्यकारी अभियंता राजेंद्र दिंडे यांनी आंदोलन-स्थळी भेट देत २४ तासात पाणी मिळेल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार टाकळी विंचूर चारीस पाणी आले. गुरुवारी झालेल्या आंदोलनात उपसरपंच शिवा सुरासे, भगवान शिंदे, किरण चव्हाण, राजेंद्र काळे, जगन काळे, गणेश निमसे, संतोष बोराडे, शांताराम निफाडे, शंकर शिंदे, रंगनाथ बोराडे, नाना जाधव, कैलास बोराडे, संतोष गोरडे, माधव काळे, मनोज काळे, नवनाथ पवार, सूर्यभान मेधणे, बळीराम जाधव, अजित पवार, संतोष गोराडे, नाना वारुळे, बाळासाहेब काळे व दीपक जाधव यांच्यासह ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: At the end of the day, water came in the water of the tinker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.