शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

पोटनिवडणुकीतील प्रचाराची रणधुमाळी उद्या संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 15:11 IST

प्रभाग क्रमांक १३ : मनसे, सेना व भाजपामध्ये तिरंगी सामना

ठळक मुद्दे मतदानाची तयारी प्रशासनामार्फत सुरू असून मंगळवारी (दि.३) २५० कर्मचाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षण घेण्यात आलेउमेदवारांकडून घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठींवर भर

नाशिक - महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ (क) च्या पोटनिवडणुसाठी येत्या शुक्रवारी (दि.६) मतदान घेण्यात येणार असून बुधवारी (दि.४) सायंकाळी ५ वाजता प्रचाराची रणधुमाळी संपणार आहे. पोटनिवडणुकीत मनसे, सेना आणि भाजपा उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होत आहे. दरम्यान, मतदानाची तयारी प्रशासनामार्फत सुरू असून मंगळवारी (दि.३) २५० कर्मचाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षण घेण्यात आले.प्रभाग क्रमांक १३ (क)मधील मनसेच्या नगरसेवक सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी दि. ६ एप्रिलला मतदान घेण्यात येणार आहे. पोटनिवडणुकीत मनसेकडून अ‍ॅड. वैशाली मनोज भोसले, शिवसेनेच्या स्नेहल संजय चव्हाण आणि भाजपाच्या विजया हरिष लोणारी या उमेदवारांमध्ये प्रमुख लढत आहे. याशिवाय, राष्टवादीच्या बंडखोर उमेदवार व माजी नगरसेवक रंजना ज्ञानेश्वर पवार यांनी देखील अपक्ष उमेदवारी करत आव्हान दिले आहे. दरम्यान, अपक्ष उमेदवार अवंतिका घोडके यांनी शिवसेनेत प्रवेश करत आपली तलवार म्यान केली आहे. ६ एप्रिलला मतदान घेण्यात येणार असल्याने बुधवारी (दि.४) सायंकाळी ५ वाजेपर्यंत जाहीर प्रचार करता येणार आहे. त्यामुळे, अखेरच्या टप्प्यात प्रचाराला वेग आला असून उमेदवारांकडून घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठींवर भर दिला जात आहे. मोठ्या प्रमाणावर प्रचार पत्रकांचेही वाटप करत मतदारांना आपली भूमिका समजावून सांगितले जात आहे. मनसेसह भाजपाने मतदानाच्या दिवशी बूथवर प्रतिनिधींच्या नियुक्त्या केल्या असून मतदान स्लिपांचेही वाटप बुधवारी-गुरुवारी केले जाणार आहे. पोटनिवडणुकीसाठी एकूण ४७ हजार २२८ मतदार असून, त्यात २४ हजार १४० पुरुष तर २३ हजार ८८ स्त्री मतदार आहेत. मतदानासाठी प्रभागात ६१ बूथ उभारले जाणार आहेत.मतदान कर्मचा-यांचे प्रशिक्षणदि. ६ एप्रिल रोजी होणा-या मतदानासाठी प्रशासनाने मंगळवारी (दि.३) २५० कर्मचा-यांचे प्रशिक्षण घेतले. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमात निवडणूक अधिकारी रोहिदास बहिरम यांनी मार्गदर्शन केले. दि. ५ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता पुन्हा एकदा प्रशिक्षण घेतले जाणार असून त्यानंतर मतदान साहित्याचे वाटप केले जाणार आहे. मतदानाकरीता प्रशासनाने ७० इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिन उपलब्ध केले आहेत. त्यातील ९ मशिन राखीव ठेवले जाणार आहेत. दि. ६ एप्रिलला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होऊन दि. ७ एप्रिलला गंगापूररोडवरील शिवसत्य कला व क्रीडा मंडळाच्या मैदानावर मतमोजणी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाElectionनिवडणूक