शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

नाशिकरोड परिसरात पदपथावर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 1:16 AM

परिसरातील हमरस्त्यावर रस्त्यापेक्षा जादा उंचीच्या असलेल्या पदपथामुळे वाहतूक कोंडी व अतिक्रमणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्त्यालगत उंचीचे फुटपाथ बनविण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.

नाशिकरोड : परिसरातील हमरस्त्यावर रस्त्यापेक्षा जादा उंचीच्या असलेल्या पदपथामुळे वाहतूक कोंडी व अतिक्रमणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्त्यालगत उंचीचे फुटपाथ बनविण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.मनपा शहर अभियंता संजय घुगे, कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी यांना नगरसेविका संगीता गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बिटको चौक हा नाशिकरोडचा केंद्रबिंदू आहे. बिटको ते शिवाजी पुतळा, शिवाजी पुतळा ते आंबेडकर पुतळा, बिटको ते महात्मा गांधी पुतळा व बिटको ते दत्तमंदिर सिग्नल या हमरस्त्यांवर रस्त्याच्या दुतर्फा एक ते दीड फूट उंचीचे चुकीचे फुटपाथ बनविण्यात आले आहेत. यामुळे या रस्त्यावरील व्यावसायिक संकुलात येणाऱ्या वाहनधारकांना आपली वाहने फुटपाथच्या बाहेर लावावी लागतात. त्यामुळे त्या भागात सातत्याने वाहतुकीची कोंडी होते. तसेच फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे.जादा उंचीच्या फुटपाथमुळे दुचाकी, चारचाकी वाहने ही संबंधित दुकान, कार्यालय यांच्या पुढील मोकळ्या जागेपर्यंत जात नाही. त्यामुळे सदर वाहने रस्त्यावरच उभी करावी लागतात.वाहनतळाचा प्रश्न सोडवावाफुटपाथमुळे दुकानापुढील अथवा इमारतीच्या मोकळ्या जागेत अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे नाशिकरोड परिसरातील प्रमुख हमरस्त्यावरील चुकीच्या पद्धतीने बनविण्यात आलेले फुटपाथ काढून ते रस्ता समान केल्यास पार्किंग व वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागेल. फुटपाथ बनविताना वरील सर्व बाबींचा विचार करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षा