मालेगावी आरक्षित जागेवरील अतिक्रमण हटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:16 IST2021-03-10T04:16:11+5:302021-03-10T04:16:11+5:30

यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की व अरेरावी करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. शहरातील नवीन कत्तलखाना ...

Encroachment on Malegaon reserved area removed | मालेगावी आरक्षित जागेवरील अतिक्रमण हटवले

मालेगावी आरक्षित जागेवरील अतिक्रमण हटवले

यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की व अरेरावी करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. शहरातील नवीन कत्तलखाना जवळ सर्वे क्रमांक ११८ मधील जागा व्यापारी गाळ्यांसाठी महापालिकेने आरक्षित केली आहे. या ठिकाणी एकाने अतिक्रमण केले असल्याचा अहवाल प्रभाग अधिकारी जगदीश बडगुजर यांनी नगररचना विभागाकडे दिला होता. त्यानुसार महापालिकेच्या नगररचना विभागाने पंचनामा करून संबंधितांना नोटीस बजावली होती. तरीदेखील त्यांनी अतिक्रमण हटवले नव्हते. त्यानंतर मंगळवारी अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या व महिला पोलीस कर्मचाऱ्यास अतिक्रमण हटविण्यास विरोध करणाऱ्या महिलेने धक्काबुक्की केली असता त्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर अतिक्रमण हटविण्यात आले.

Web Title: Encroachment on Malegaon reserved area removed