शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचाऱ्याला मारहाण

By admin | Published: November 18, 2015 11:52 PM

महात्मानगरला मोहीम : दुकानमालकाविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने बुधवारी महात्मानगर आणि उंटवाडी रोडवरील संभाजी चौकात दुकानमालकांनी अनधिकृतपणे उभारलेले बांधकाम हटविण्याची मोहीम राबविली. कारवाई सुरू असतानाच महात्मानगर येथे दुकानमालक नरेंद्रसिंग बिंद्रा यांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाला विरोध करत एका कर्मचाऱ्यास मारहाण केल्याने महापालिकेने बिंद्रा यांच्याविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.महापालिकेच्या पश्चिम विभागातील अतिक्रमण निर्मूलन विभागाने बुधवारी सकाळी उंटवाडी रोड परिसरातील संभाजी चौकात पोकार रेसिडेन्सी या इमारतीत आर. सी. बाफना ज्वेलर्स यांनी अनधिकृतपणे उभारलेले पत्र्याचे शेड हटविण्याची कारवाई केली. त्यानंतर अतिक्रमण विरोधी पथकाने आपला मोर्चा महात्मानगर येथे वळविला आणि मोना चेंबर्स को-आॅप. सोसायटीच्या इमारतीत सामासिक अंतरात नरेंद्रसिंग बिंद्रा यांनी अनधिकृतपणे उभारलेले पत्र्याचे शेड हटविले. याचवेळी दुकानाचे अनधिकृत बांधकामही हटविण्यात येऊन साहित्यही जप्त करण्यात आले. मोहीम सुरू असतानाच दुकानमालक नरेंद्रसिंग बिंद्रा यांनी अतिक्रमण विभागाच्या पथकाला विरोध केला, शिवाय जीवन ठाकरे या कर्मचाऱ्यास मारहाणही केली. त्यामुळे शासकीय कामात अडथळा आणला म्हणून महापालिकेने दुकानमालक बिंद्रा यांच्याविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. महापालिकेने महात्मानगर येथेच रमेश चेणाणी यांच्या दुकानासमोरील पत्र्याचे शेडही उद्ध्वस्त केले. या मोहिमेत पश्चिमच्या विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, सहायक अधीक्षक जी. जे. गवळी, यू. डी. जाधव, एस. यू. पगार, नगररचनाचे सहायक कनिष्ठ अभियंता प्रदीप भामरे यांच्यासह महापालिकेचे ५० कर्मचारी आणि २० पोलीस सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)