शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

साधुग्रामच्या जागेवर झोपड्यांचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 18:52 IST

सिंहस्थ कुंभमेळयासाठी प्रशासनाने तपोवनात साधुग्रामसाठी आरक्षित केलेल्या जागेवर परिसरातील काही झोपडपट्टी धारकांनी केलेले झोपडयांचे अतिक्रमण वारंवार हटविल्यानंतरही पुन्हा झोपडपट्टीत राहणाºया नागरीकांनी त्याच जागेवर अनधिकृत झोपडया व पाल उभारून अतिक्रमण केले आहे. परंतु या प्रकाराकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या परिसरातील अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देतपोवनात अनाधिकृत झोपड्यांत वाढ अतिक्रमाणाकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष 

नाशिक :शहरात प्रत्येक बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळयासाठी प्रशासनाने तपोवनात साधुग्रामसाठी आरक्षित केलेल्या जागेवर परिसरातील काही झोपडपट्टी धारकांनी केलेले झोपडयांचे अतिक्रमण वारंवार हटविल्यानंतरही पुन्हा झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरीकांनी त्याच जागेवर अनधिकृत झोपडया व पाल उभारून अतिक्रमण केले आहे. परंतु या प्रकाराकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या परिसरातील अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. महानगरपालिकेच्या पंचवटी विभागातील अतिक्रमण विभागाने  काही महिन्यांपूर्वी साधुग्रामच्या जागेवरील शंभरहून अधिक अनधिकृत झोपडया हटविण्याचे काम केले होते. या झोपडया हटवितांना महिलांनी महापालिकेच्या  अतिक्रमण हटविणाºया पथकावर दगडफेक करून दहशत निर्माण केली होती. या प्रकारानंतर मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी आडगाव पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणला म्हणून तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली खरी परंतू काही अधिकाऱ्यांनी ऐनवेळी नमती बाजू घेत तक्रार न देता माघारी फिरण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली होती. या प्रकारामुळे अतिक्रमण करणाऱ्या झोपडपट्टीवासियांची हिंमत वाढली आहे. शासनाने सिंहस्थ कुंभमेळयासाठी तपोवनात साधुग्रामसाठी जागा आरक्षित केली असून झोपडपट्टीधारक याच जागेवर वारंवार अनधिकृत झोपडया थाटून महानगरपालिकेसमोर आव्हान उभे करीत असताना हटविण्यात आलेल्या झोपडया पुन्हा उभ्या केल्या जात असताना या अनधिकृत झोपडयांकडे महानगरपालिकेच्या पंचवटी अतिक्रमण विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद रोडवर थाटलेल्या या झोपडपट्टयांमुळे परिसराला बकाल स्वरूप प्राप्त तर झाले असून या भागातील अस्वच्छतेमुळे  विविध प्रकारचे आजार पासरण्याची दाट भिती परिसरातील नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. 

 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका