अतिक्रमणधारकांची महापालिका कर्मचाऱ्यास धक्काबुक्की
By Admin | Updated: May 22, 2017 17:46 IST2017-05-22T17:46:16+5:302017-05-22T17:46:16+5:30
अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकातील कर्मचाऱ्यास शिवीगाळ करीत धक्काबुक्की

अतिक्रमणधारकांची महापालिका कर्मचाऱ्यास धक्काबुक्की
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकातील कर्मचाऱ्यास शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्याची घटना भोसला सर्कल भागात घडली. याप्रकरणी एका अतिक्रमणधारकाविरूध्द गंगापूर पोलिसात शासकिय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामराव मधुकर चव्हाण (६६ रा.रामनगर नवीन गंगापूर नाका) असे संशयीताचे नाव आहे. महापालिकेच्या अतिक्रमण पथक रविवारी सायंकाळी भोसला सर्कल भागातील वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण काढत असतांना ही घटना घडली. याप्रकरणी शिवाजी लहू काळे (रा.चराई कॉटेज सातपुर) या मनपा कर्मचाऱ्याने तक्रार दाखल केली आहे. काळे आपल्या पथकासह भोसला सर्कल जवळील श्रीकृष्ण हॉटेल भागात अतिक्रमण निर्मुलन मोहिम राबवित असतांना संशयीतांने काळे यांच्या अंगावर धावून जात साहित्य जप्त करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. या कारणावरून गोंधळ घालत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत संशयीत काळे यांना धक्काबुक्की केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गंगापूर पोलिसांनी संशयीतास अटक केली असून अधिक तपास उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.