गंजमाळवरील गाळ्यांचे अतिक्रमण हटविले
By Admin | Updated: October 31, 2015 23:13 IST2015-10-31T23:12:13+5:302015-10-31T23:13:23+5:30
गंजमाळवरील गाळ्यांचे अतिक्रमण हटविले

गंजमाळवरील गाळ्यांचे अतिक्रमण हटविले
नाशिक : पूर्व विभागातील गंजमाळ परिसरातील चाचा पॅलेस इमारतीमधील तीन गाळ्यांचे अनधिकृतपणे करण्यात आलेले पक्के बांधकाम मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून हटविण्यात आले.
अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, मालिनी शिरसाठ आदि अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गंजमाळ येथील अतिक्रमित गाळ्यांचे अनधिकृत बांधकाम शनिवारी हटविण्यात आले. इमारतींच्या आवारात, तसेच वाहनतळांच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांना तत्काळ बांधकाम काढून घेण्याच्या सूचना वेळोवेळी दिल्या आहेत; मात्र याकडे नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने अतिक्रमित बांधकामावर कारवाई सुरूच राहणार असल्याचे बहिरम यांनी सांगितले.