इंदिरानगरला जाहिरात फलकांचे अतिक्रमण
By Admin | Updated: December 6, 2015 22:40 IST2015-12-06T22:39:08+5:302015-12-06T22:40:23+5:30
इंदिरानगरला जाहिरात फलकांचे अतिक्रमण

इंदिरानगरला जाहिरात फलकांचे अतिक्रमण
इंदिरानगर : परिसरात विनापरवानगी जाहिरात फलक लावण्याची जणू काही स्पर्धाच सुरू आहे. त्यामुळे विद्रुपिकरणामुळे बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. तातडीने विनापरवानगी फलक आणि होर्डिंग काढण्याची मागणी होत आहे.
गजानन महाराज मार्ग, वडाळा-पाथर्डी रस्ता, श्रीकृष्ण चौक ते राणेनगर चौफुली, राजेछत्रपती चौक ते राजीवनगर झोपडपट्टी मोदकेश्वर चौक ते बापू बंगला, विनयनगर, चेतनानगर, राणेनगर, समर्थनगर, सार्थकनगरसह परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावर फलक आणि होर्डिंग लावण्यात येत आहे. यामध्ये महापालिकेचे पथदीप आणि महावितरण कंपनीच्या रोहित्राच्या जाळ्यांवर ही फलक लावण्यात येत आहे.
मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने तातडीने विनापरवानगी होर्डिंग आणि फलकावर जातीची कारवाई करावी. तसेच संबंधितांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)