शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

आयुक्तांशी तडजोडीसाठी आमदारांची शिष्टाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 01:10 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि महापौरादी मंडळींचे मतभेद पराकोटीला जात असल्याचे दिसत असताना मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी त्यांच्यात कृष्णशिष्टाईचा प्रयत्न केला आहे. उभयतांनी गुण्यागोविंदाने शहराचा कारभार हाकण्याची तयारी दर्शविल्याचे वृत्त आहे.

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि महापौरादी मंडळींचे मतभेद पराकोटीला जात असल्याचे दिसत असताना मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी त्यांच्यात कृष्णशिष्टाईचा प्रयत्न केला आहे. उभयतांनी गुण्यागोविंदाने शहराचा कारभार हाकण्याची तयारी दर्शविल्याचे वृत्त आहे.  महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके-आहेर तसेच सभागृह नेता दिनकर पाटील आणि गटनेता संभाजी मोरूस्कर यांच्यात मंगळवारी दुपारी आयुक्तांच्या दालनात बैठक झाली. त्यात हा समेटाचा प्रयत्न झाल्याचे समजते. आयुक्त विश्वासात घेत नाहीत तसेच लोकप्रतिनिधींचे प्रस्ताव परत पाठवतात किंवा अमान्य करतात येथपासून करवाढीस विरोध करणारे हेच लोकप्रतिनिधी कोट्यवधी रुपयांच्या खर्चाच्या कामांचे प्रस्ताव आपल्याकडे पाठवत असल्याचे आयुक्तांनी सांगितल्याचे समजते.विरोधी पक्ष हे सत्ताधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत असल्याबद्दल चर्चा करण्यात आली. त्याचवेळी आयुक्तांनी लोकप्रतिनिधींना सन्मानाची तर लोकप्रतिनिधींनी आयुक्तांना सन्मानाची वागणूक द्यावी, अकारण टिप्पणी करणे टाळावे, अशी चर्चा झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.संघर्ष टाळण्यासाठीच...महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि लोकप्रतिनिधी यांच्यात संघर्ष वाढत असून, आयुक्तांवर अविश्वास ठराव आणण्याच्या चर्चा झडत आहेत. इतकेच नव्हे तर संपकरी कर्मचारीसंघटनांना महापौरांसह अन्य पदाधिकाºयांनी पाठिंबा दिल्याने शहरात वेगळे चित्र निर्माण होत आहे. महापालिकेत आणि राज्यात भाजपाची सत्ता असतानाही अशाप्रकारचे संघर्ष दिसून येत असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

टॅग्स :MLAआमदारNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका