तंबाखूमुक्तीसाठी इच्छाशक्ती, समुपदेशन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:44 AM2018-05-31T00:44:28+5:302018-05-31T00:44:28+5:30

कामातील ताणतणाव टाळण्यासाठी, गंमत म्हणून सुरू केल्यानंतर व्यसनच लागल्याने तंबाखू खाणाऱ्यांना कर्करोगासह असंख्य व्याधींना सामोरे जावे लागते.

 Empowerment of counseling, counseling required | तंबाखूमुक्तीसाठी इच्छाशक्ती, समुपदेशन आवश्यक

तंबाखूमुक्तीसाठी इच्छाशक्ती, समुपदेशन आवश्यक

Next

नाशिक : कामातील ताणतणाव टाळण्यासाठी, गंमत म्हणून सुरू केल्यानंतर व्यसनच लागल्याने तंबाखू खाणाऱ्यांना कर्करोगासह असंख्य व्याधींना सामोरे जावे लागते.  स्वत:चा व कुटुंबाचा यापासून बचाव करण्याची इच्छा असणायांसाठी निकोटिन च्युइंगमसह इतर अनेक पर्याय, औषधोपचार व तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन उपलब्ध असून, त्याचा लाभ घेतल्यास या घातक व्यसनापासून मुक्तता मिळवता येऊ शकते, असा विश्वास मानसोपचार व कर्करोगतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. जागतिक तंबाखूविरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला असता, व्यसनांपासून वाचवत जीवन समृद्ध करावे, आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अंगीकार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रीकॅन्सरचे वाढते प्रमाण
नाशिक शहरातील लोकसंख्येचा विचार केल्यास दर शंभर व्यक्तींमागे ५० ते ६० लोकांना तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन असल्याचे समोर आले आहे. त्यांची तपासणी केल्यास प्रीकॅन्सरचे निदान पाहायला मिळते. त्यात तोंडात लाल, पांढरे चट्टे पाहायला मिळतात. वारंवार तंबाखू खाऊन तोंडातील स्नायू आखडून जातात. अशा व्यक्तींचे तोंडही पूर्ण उघडत नाही. धोक्याची घंटा वेळीच जाणून अशा व्यसनांपासून स्वत:ला लवकरात लवकर सोडवणे गरजेचे आहे.
निकोटिन च्युइंगम हे तंबाखू सोडविण्याचे साधन असले तरी ते स्वत:च्याच मनाने सुरू करणे चुकीचे आहे. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे, मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक यांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. निकोटिन वापरण्याची थेरपी असते. च्युइंगमच्या पाकिटात त्यासंबंधी सविस्तर माहिती देणारी चिठ्ठी असते. लोक ती चिठ्ठी वाचतच नाहीत. त्यामुळे स्वत:च्याच मनाने कितीही च्युइंगम चघळले तरी त्याचा काही उपयोग होऊ शकणार नाही.
- डॉ. शिल्पा बांगड, जिल्हा सल्लागार,
राष्टय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम
व्यसनाधिन व्यक्तींनी आपण व्यसनाला का सुरुवात केली याचा शोध घेतला पाहिजे. तरच ते त्या व्यसनापासून स्वत:ला सोडवू शकतात. आपले व्यसन चुकीचे आहे हे जाणून घेतले पाहिजे. व्यसनाचे प्रमाण हळूहळू कमी करू असे म्हणण्यापेक्षा आतापासूनच पूर्णपणे थांबवू असा निश्चय केला तरच व्यसन सोडवता येते. व्यसनमुक्तीसाठी खूप चांगले औषधोपचार, थेरपी, तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. त्यांची जरूर मदत घ्यावी. स्त्रियांनीही मिस्रीचे व्यसन दूर करावे.
- डॉ. रुचा सुळे-खोत, मानसोपचारतज्ज्ञ
तंबाखूचे व्यसन व त्यामुळे होणारे गंभीर आजार याचे प्रमाण आपल्याकडे दुर्दैवाने वाढतच चालले आहे. गेल्या दशकभरात झालेल्या ५.८ लाख मृत्यूंचे निदान हे कर्करोग असल्याचे समोर आले आहे. तरुणाई तंबाखूसारख्या व्यसनांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडकत चालली आहे. यासाठी शाळा-कॉलेजात प्रबोधन होणे गरजेचे असून, लोकांनी आपल्या जीवनाचे मोल जाणून घ्यावे.
- डॉ. राज नगरकर, कर्करोगतज्ज्ञ

Web Title:  Empowerment of counseling, counseling required

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.