तरुणाईच्या 'फ्रेन्डशिप सेलिब्रेशन'ला उधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 19:50 IST2017-08-06T19:42:35+5:302017-08-06T19:50:52+5:30

 Empowering the youth 'Friendship Celebration' | तरुणाईच्या 'फ्रेन्डशिप सेलिब्रेशन'ला उधान

तरुणाईच्या 'फ्रेन्डशिप सेलिब्रेशन'ला उधान

ठळक मुद्दे ‘दुधसागर’ धबधब्याची मोहिनीमैत्री दिनाचा मुहूर्तनाशिकच्या मिसळ पॉइंटचा लळातरुणाईच्या मैत्रीला बहर धबधब्याजवळ मित्र-मैत्रिणींसोबत सेल्फीमैत्रीच्या आठवणींचा ठेवा जपण्याचा प्रयत्न

नाशिक : मैत्री ही वर्षानुवर्षांची असते; मात्र या मैत्रीला व्यक्त करण्यासाठी निमित्त हवं असतं अन् ते निमित्त आॅगस्टच्या पहिल्या रविवारी (दि.६) तरुणाईने नेमकं साधलं...शहरातील विविध हॉटेल्स, मिसळ पॉइंट, उद्याने अन् पर्यटनस्थळी तरुणाईच्या मैत्रीला बहर आल्याचे चित्र पहावयास मिळाले.
आपल्या मित्र-मैत्रिणींच्या मनगटावर मैत्रीची आठवण करुन देणारे ‘बॅन्ड’ बांधत तरुणाईने औपचारिकता पुर्ण के ली अन् दिवसभर मित्र-मैत्रिणींसोबत धम्माल करत जल्लोष केला. मैत्री दिनाचा मुहूर्त...रविवारची सुटी...नाशिकच्या मिसळ पॉइंटचा लळा... ‘दुधसागर’ धबधब्याची मोहिनी... तरुणाईमध्ये दिसून आली. तरुण-तरुणींचे समुह सकाळपासून सोमेश्वरजवळील ‘दुधसागर धबधबा’, गंगापुररोड, मखमलाबाद परिसरातील विविध मिसळ पॉइंट, गंगापूर धरण परिसर, पांडवलेणी, फाळके स्मारक परिसर, गोदा पार्क भागात तरुणाईचा आनंदाला उधाण आले होते.


गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग अत्यंत कमी स्वरुपात सुरू असल्यामुळे दुधसागर धबधब्याचा रुद्रावतार कमी झाला आहे. यामुळे तरुणाईने थेट अगदी धबधब्याजवळ जाऊन मित्र-मैत्रिणींसोबत ‘सेल्फी क्लिक’ केला. महाविद्यालयीन जीवनातील हे क्षण आयुष्यभर तरुण-तरुणींच्या लक्षात राहतात. त्यामुळे प्राधान्याने आपल्या मैत्रीच्या आठवणींचा ठेवा जपण्याचा प्रयत्न मैत्री दिनाच्या निमित्ताने झाल्याचे दिसून आले.

Web Title:  Empowering the youth 'Friendship Celebration'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.