कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या होणारच

By Admin | Updated: July 1, 2014 01:29 IST2014-06-30T23:22:05+5:302014-07-01T01:29:11+5:30

नाशिक : एकाच टेबलावर तीन वर्षे व एकाच विभागात पाच वर्षे झालेल्या मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणारच, अशी ठाम भूमिका मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी घेतली.

Employees will undergo transfers | कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या होणारच

कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या होणारच

नाशिक : एकाच टेबलावर तीन वर्षे व एकाच विभागात पाच वर्षे झालेल्या मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणारच, अशी ठाम भूमिका मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी घेतली असून, शिपायापासून कक्ष अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचा त्यात समावेश असेल, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
दरम्यान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयात सोमवारी (दि.३०) सायंकाळी सुखदेव बनकर यांनी अचानक भेट देऊन तपासणी केली असता उपअभियंत्यासह कार्यालयीन अधीक्षक व अन्य दोन लिपिक जागेवर न आढळल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश सुखदेव बनकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांची कार्यवाही करण्यात येणार असून, त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या विभागाची व कार्यरत टेबलांची माहिती प्रशासनाने अन्य विभागांकडून मागविली आहे. मात्र बदल्या न करण्याच्या कार्यवाहीबाबतही काही विभागात ‘अर्थपूर्ण’ तडजोडी सुरू झाल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. बदल्यांमध्ये कोणालाही वगळले जाणार नाही, असे सुखदेव बनकर यांनी स्पष्ट केल्याने काही कार्यालयीन अधीक्षक व कक्ष अधिकाऱ्यांमध्ये मात्र घबराटीचे वातावरण पसरल्याचे चित्र आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Employees will undergo transfers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.