मोजणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना माघारी धाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 19:39 IST2018-03-25T19:39:20+5:302018-03-25T19:39:20+5:30

 Employees sent for recruitment | मोजणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना माघारी धाडले

मोजणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना माघारी धाडले

सिन्नर : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गाला सिन्नर तालुक्यातील शिवडे येथील शेतकºयांचा विरोध असतांना रविवारी अचानक मोजणीसाठी काही कर्मचारी आले. याची माहिती शेतकºयांना मिळताच शेतकºयांनी त्यांना ताब्या घेऊन विचारपूस केली. कर्मचाºयांनी माफी मागितल्यानंतर चार तासानंतर शेतकºयांनी त्यांची सुटका केली. प्रस्तावित नागपूर-मुंबई समृध्दी महामार्ग सिन्नर तालुक्यातून जात आहे. मात्र पश्चिम पट्ट्यातील बागायती भागातील काही गावांनी त्यास तीव्र विरोध केला आहे. शिवडे गाव विरोधाचे केंद्रबिंदू आहे. शिवडे येथील शेतकºयांनी अद्याप मोजणी होवू दिलेली नाही.

Web Title:  Employees sent for recruitment