शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

डेली वसुलीवरच कर्मचाऱ्यांचे वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 01:00 IST

पेठ : कोरोना विषाणूचा संसर्ग आणि त्यामुळे घोषित झालेला लॉकडाऊन यामुळे सर्वच क्षेत्रावर कमी जास्त प्रमाणात प्रतिकूल परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अवघ्या चार-पाच वर्षाच्या स्थापनेनंतर नुकतेच विकासाचे बाळसं धरू पाहणाºया पेठ नगरपंचायतीलाही या कोरोनाचा मोठा आर्थिक फटका बसला असून, अपूर्ण निधी व मुदतीत कामे पूर्ण न झाल्याने विकासकामांना ब्रेक लागला आहे.

पेठ : (रामदास शिंदे ) कोरोना विषाणूचा संसर्ग आणि त्यामुळे घोषित झालेला लॉकडाऊन यामुळे सर्वच क्षेत्रावर कमी जास्त प्रमाणात प्रतिकूल परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अवघ्या चार-पाच वर्षाच्या स्थापनेनंतर नुकतेच विकासाचे बाळसं धरू पाहणाºया पेठ नगरपंचायतीलाही या कोरोनाचा मोठा आर्थिक फटका बसला असून, अपूर्ण निधी व मुदतीत कामे पूर्ण न झाल्याने विकासकामांना ब्रेक लागला आहे. दैनंदिन भरणाºया भाजी बाजाराच्या तुटपुंज्या वसुलीवर नगरपंचायतीचा आर्थिक गाडा कसाबसा हाकण्याची लोकप्रतिनिधी व प्रशासनावर वेळ आली आहे.पेठ ग्रामपंचायतीला नगरपंचायतचा दर्जा मिळाल्यानंतर प्रथमच स्थापन झालेल्या मंडळाला पहिले २-३ वर्ष शासकीय प्रक्रि या व विकास आराखडे तयार करण्यातच घालवावी लागली.नंतरच्या काळात परप्रांतीय मजुरांनी गावाकडची वाट धरल्याने सुरू असलेल्या कामांना ब्रेक लागला. नगरपंचायतीला बाजार गाळे भाडेपट्टीतून बºयापैकी उत्पन्न मिळत असते. मात्र तीन महिन्यांपासून लहान-मोठे सर्वच व्यवहार बंद असल्याने व शासनाने वसुलीवर निर्बंध ठेवल्याने वसुलीचा आकडा उद्दिष्टापर्यंत पोहचू शकला नाही. शासकीय अनुदानाच्या भरवशावर रस्ते, गटारी, सांडपाणी, पाणीपुरवठा, घनकचरा विलगीकरण अशी अनेक कामे रखडली आहेत.--------------------१) मागील वर्षापासून नगरपंचायतीची विकासकामे गती घेतील अशी आशा असताना ऐन मार्च महिन्यात जाहीरझालेल्या लॉकडाऊनमुळे नगरपंचायतीच्या विकासकामांना खीळ बसली.२) मार्च महिना तसा आर्थिक वर्षाचा अंतिम महिना असल्याने सर्वच विभागांची १०० टक्के वसुली करण्याबरोबर शासनाकडील निधी प्राप्त करून विहीत वेळेत कामे पूर्ण केली जातात.३) ना वसुली करता आली ना शासकीय निधी खर्च करता आला. अशा आर्थिक कोंडीत नगरपंचायतीचा कारभार सापडला आहे. लॉकडाऊनमध्ये व्यवहार ठप्प झाल्याने उत्पन्नात कमालीची घट झाल्याचे दिसून आले.----------------------१३ कोटींची पाणीपुरवठा योजना ठप्प४पेठ शहराची वाढती लोकसंख्या व शहरीकरणामुळे १३ कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर असूनही लॉकडाऊनमुळे ३१ मेपर्यंत काम पूर्ण करणे शक्य नसल्याने प्राप्त निधी परत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेक विकासकामांच्या निविदा व कार्यारंभ आदेश निर्गमित होऊनही विहीत वेळेत पूर्ण होऊ न शकल्याने विकासकामांची गती मंदावली आहे. सन २०१८-१९ या वर्षी नगरपंचायतीला ४ कोटी ८० लाख शासकीय निधी प्राप्त झाला होता. सन २०१९-२० मध्ये केवळ १ कोटी ७३ लाख निधी प्राप्त झाल्याने नगरपंचायतीचे आर्थिक गणित बिघडले.---------------------असे आहेत वसुलीचे आकडेतपशील - सन २०१८-१९ सन २०१९-२०४घरपट्टी - ३,६७,३०७ ९,९६,०००४पाणीपट्टी - ३,४१,३४० २,३७,३८०४ गाळा भाडे - ३,५८,९९० ३,२१,५००४ विकास शुल्क - २,३०,९०८ १,१०,७७८----------------------पेठ नगरपंचायत ही आदिवासीबहुल क्षेत्रात असल्याने व्यावसायिक व औद्योगिक दृष्ट्या उत्पन्नाचे मोठीसाधने नाही. त्यामुळे अत्यंत तुटपुंज्या निधीवर नगरविकास करावा लागत असून, शासनाने आदिवासी क्षेत्रातील नगरपंचायतींना स्वतंत्र आर्थिक पॅकेज देण्यासाठी विचार करावा. यावर्षी आर्थिक फटका बसल्याने नगरपंचायतच्या पुढील वर्षाच्या नियोजन आराखड्यावर भार येणार असल्याने कोरोनामुळे नगरपंचायत प्रशासन आर्थिक विवंचनेत सापडले असले तरी आगामी काळात जनतेला नागरी सुविधा देण्यासाठी नगरपंचायत कटिबद्ध आहे.- मनोज घोंगे, नगराध्यक्ष, पेठ

टॅग्स :Nashikनाशिक