म्युनिसिपल कामगार सेनेतर्फे कर्मचाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:15 IST2021-05-20T04:15:40+5:302021-05-20T04:15:40+5:30

गेल्यावर्षीपासून ते आजपर्यंत कोरोना साथरोग महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका कर्मचारी अत्यावश्यक सेवा देत आपले कर्तव्य बजावत आहेत, असे मत ...

Employees felicitated by Municipal Kamgar Sena | म्युनिसिपल कामगार सेनेतर्फे कर्मचाऱ्यांचा सत्कार

म्युनिसिपल कामगार सेनेतर्फे कर्मचाऱ्यांचा सत्कार

गेल्यावर्षीपासून ते आजपर्यंत कोरोना साथरोग महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका कर्मचारी अत्यावश्यक सेवा देत आपले कर्तव्य बजावत आहेत, असे मत सहायक अधीक्षक भूषण देशमुख यांनी व्यक्त केले. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे व सर्व पदाधिकारी यांच्याकडून मनपाचे आयुक्त कैलास जाधव प्रशासन अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांचे आभार मानून, लसीकरण करणेकामी कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी राजकुमार दयमा, उपशिक्षक उमेश महाले, फार्मासिस्ट मिता कुलकर्णी, लॅब टेक्निशियन महेश भड, डाटा ऑपरेटर दीपराज मोगरे, सोनाली निकम, नंदा गांगुर्डे यांचा म्युनिसिपल कर्मचारी मनपा पंचवटी विभाग कामगार सेनेतर्फे अध्यक्ष सहा. अधीक्षक भूषण देशमुख, प्रकाश उखाडे यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी राजेश सोनवणे, दीपक मिंधे, संजय बोरसे, राहुल बोटे, विजय हिरे, रमेश गायकवाड, सचिन गवळी, सनी काळे उपस्थित होते.

Web Title: Employees felicitated by Municipal Kamgar Sena