राज्य कर्मचाऱ्यांनाही वेतन आयोगाचे वेध
By Admin | Updated: November 21, 2015 00:01 IST2015-11-21T00:01:40+5:302015-11-21T00:01:48+5:30
सातवा वेतन आयोग : कर्मचारी संघटनांकडून संमिश्र प्रतिक्रिया

राज्य कर्मचाऱ्यांनाही वेतन आयोगाचे वेध
नाशिक : वाढत्या महागाईच्या काळात केंद्रीय व राज्य कर्मचाऱ्यांना वेतन पुरसे ठरत नसून दिलेला महागाई भत्ता व वेतन लागू करण्याची पद्धतही दशकभर जुनी आहे. आताही केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येणारा सातवा वेतन आयोग प्रत्यक्षात २०१८ मध्ये लागू होणार आहे. तेव्हा महागाई आणखी गगनाला भिडलेली असेल. नाही म्हणायला या वेतन आयोगाचा थोडा फार तरी आधार कर्मचाऱ्यांना होत असल्याची प्रतिक्रिया विविध कर्मचारी संघटनांच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे.