विद्युत भवनासमोर कर्मचाऱ्यांची निदर्शने
By Admin | Updated: August 2, 2016 01:54 IST2016-08-02T01:54:18+5:302016-08-02T01:54:29+5:30
विद्युत भवनासमोर कर्मचाऱ्यांची निदर्शने

विद्युत भवनासमोर कर्मचाऱ्यांची निदर्शने
नाशिकरोड : महावितरण कंपनीतील कंत्राटी कामगारांना पगार मिळावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघातर्फे सोमवारी दुपारी वीज भवनसमोर निदर्शने करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघातर्फे उपऔद्योगिक अधिकारी विश्वास पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर संघाचे अध्यक्ष एस. ए. कुलकर्णी, रिझवान शेख, कुंदन भास्करे, इद्रीस शेख, संतोष शिंदे, गणेश विसपुते, अयुब मनियार, पी. एन. शिंदे, सचिन पाटील, ज्ञानेश्वर पन्हाळे, गणेश कोकणे, हरिभाऊ चौतमल, संतोष शेळके, कोंडाजी खेमनर, सुभाष लांडगे आदिंच्या सह्या आहेत.