वसाहतीत घाणीचे साम्राज्य

By Admin | Updated: May 20, 2017 00:56 IST2017-05-20T00:56:40+5:302017-05-20T00:56:49+5:30

येवला : शहरातील दुहेरी सदनिकेजवळ म्हाडाने दलित वसाहतीत बांधून दिलेल्या सुमार दर्जाच्या घरकुल योजना परिसरात गटारी व सांडपाण्याची व्यवस्था नाही.

Empire of the Valley | वसाहतीत घाणीचे साम्राज्य

वसाहतीत घाणीचे साम्राज्य

 लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : शहरातील स्टेशन रोडवरील पालिकेकडे जाणाऱ्या, दुहेरी सदनिकेजवळ म्हाडाने दलित वसाहतीत बांधून दिलेल्या सुमार दर्जाच्या घरकुल योजना परिसरात गटारी व सांडपाण्याची व्यवस्था नाही. गटारीच नसल्याने पाण्याचा निचरा होत नाही. तुंबलेल्या पाण्यात घाण साचून परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. घाणीमुळे रोगराई पसरत असल्याने नागरिकाचे जीवनमान धोक्यात आले आहे. घरे आहेत पण शौचालये चालू अवस्थेत नाही. पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. परिसर घाण पाण्याने तुडूंब भरल्यामुळे डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. डासांची उत्पत्ती वाढत आहे. वैद्यकीय उपचाराची वेळ येण्याअगोदर पालिकेने उपाययोजना करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. नगरपालिकेने याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याबाबत परिसरातील नागरिकांनी अनेकवेळा मागणी केली असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
ड्रेनेज व्यवस्था व पाइपलाइन नसल्याने घरातील शौचालये कधीच चालू झाले नाही. घर, निवारा नसल्याने नाइलाजाने आम्हाला येथे राहावे लागते आहे. दलित वसाहत सुधारणा निधी नेमका जातो कुठे, असा सवाल येथील नागरिकांनी विचारला आहे.
२००९ मध्ये या वसाहतीत १०० रुपयांच्या बंधपत्रावर तात्पुरता निवारा करण्यासाठी घरे दिलीत. १०८ घरांचे तात्पुरते वाटप झाले असल्याची माहिती समोर येत आहे. या तात्पुरत्या लाभार्थींपैकी अनेकांकडे निवारा नसल्याने त्यांना येथे राहण्याशिवाय पर्याय नाही.म्हणून केवळ ६० ते ७० कुटुंब येथे राहतात. २०१० च्या पहिल्या पावसाळ्यात येथे कमरेएवढे पाणी साचले होते. आजतागायत प्रत्येक पावसाळ्यात अशीच परिस्थिती आहे.

 

Web Title: Empire of the Valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.