एकच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापनेवर भर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:18 IST2021-09-04T04:18:37+5:302021-09-04T04:18:37+5:30

सिन्नर : कोरोनाचे संकट अजून गेलेले नाही. गर्दी वाढल्यावर कोरोना वाढतो. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ...

Emphasize the establishment of a single public Ganeshotsav Mandal | एकच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापनेवर भर द्या

एकच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापनेवर भर द्या

सिन्नर : कोरोनाचे संकट अजून गेलेले नाही. गर्दी वाढल्यावर कोरोना वाढतो. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नियम लागू केले आहेत. त्यामुळे शक्यतो शहर व गावागावांत एकच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना करावी. उत्साहाच्या भरात कोरोनाच्या संकटाचीही जाणीव ठेवावी, असे आवाहन नाशिक ग्रामीणच्या अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावकर (घारगे) यांनी केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोकशहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात शांतता समितीचे सदस्य, गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे अपर अधीक्षक वालावलकर बोलत होत्या. निफाड विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे, तहसीलदार राहुल कोताडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार, सिन्नरचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, वावीचे सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष किरण डगळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, दत्ता वायचळे, नामदेव कोतवाल, तालुका कॉँग्रेसचे अध्यक्ष विनायक सांगळे, हरिभाऊ तांबे, कुंदेवाडीचे सरपंच रतन नाठे यांच्यासह गणेशोत्सव मंडळाच्या र्कायकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी नगरसेवक हेमंत वाजे, शीतल कानडी, प्रभाकर गोळेसर, मनीष गुजराथी, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राजाराम मुरकुटे, कैलास क्षत्रिय यांच्यासह गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते व शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.

चौकट-

वालावलकर यांनी केलेल्या सूचना...

प्रत्येक मंडळाने समजूतदारपणाची भूमिका घ्यावी. मूर्तीचा आकार चार फुटांपेक्षा उंच असणार नाही याची काळजी घ्यावी, असे त्या म्हणाल्या. मिरवणुकींना बंदी असल्याचे त्यांनी सांगितले. कृत्रिम तलावांची निर्मिती करून त्यात घरगुती गणेशोत्सव मूर्तीचे विसर्जन करावे. कार्यकर्त्यांनी लक्षणे दिसल्यानंतर विलग होऊन तातडीने तपासणी करून घ्यावी. नवीन मंडळांना परवानगी मिळणार नाही. वर्गणीसाठी सक्ती करू नये.

------------------

मिरवणूक काढायची तरी कशी

कोरोनामुळे शासनाने गणेशोत्सवात पाच जणांनी एकत्र यायचे नाही, असा आदेश काढला असल्याची माहिती वालावलकर यांनी दिली. त्यामुळे मिरवणुकीत वाजंत्रीवाले तीन-चार जण असतील, तर मंडळाचे कार्यकर्ते त्यात सहभागी कसे होतील, असे सांगत सवाल उपस्थित करून मिरवणुकीच्या नियमांबाबत उपस्थितांना समज दिली.

Web Title: Emphasize the establishment of a single public Ganeshotsav Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.