इंदिरानगरात सामाजिक देखाव्यांवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:36 AM2019-09-10T00:36:36+5:302019-09-10T00:37:01+5:30

श्री प्रतिष्ठानच्या वतीने श्रद्धाविहार कॉलनीच्या प्रवेशद्वारालगत जय जवान जय किसानचा भव्य देखावा सादर करण्यात आला आहे.

 Emphasis on social scene in Indiranagar | इंदिरानगरात सामाजिक देखाव्यांवर भर

इंदिरानगरात सामाजिक देखाव्यांवर भर

Next

इंदिरानगर : श्री प्रतिष्ठानच्या वतीने श्रद्धाविहार कॉलनीच्या प्रवेशद्वारालगत जय जवान जय किसानचा भव्य देखावा सादर करण्यात आला आहे. विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे, असे अ‍ॅड. श्याम बडोदे यांनी सांगितले. जयवंत टक्के, गोपाल आव्हाड, भरत शिरसाट, मनीष पाटील, योगेश रेवगडे हे सदस्य सहकार्य करीत आहे.
इंदिरानगर उत्सव समितीच्या वतीने सांगली व कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन सुप्रिया खोडे व सुनील खोडे यांनी केले आहे.
ज्ञानेश्वर नगर येथे क्र ांतिवीर सेना प्रणित शंभू नारायण ग्रुपच्या वतीने नाशिकचा विघ्नहर्ता सुमारे २१ फूट श्रीगणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तसेच होम मिनिस्टर, आनंद मेळावा, विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे शिवा तेलंग यांनी सांगितले.
स्वा. वि. दा. सावरकर मित्रमंडळ, अरुणोदय मित्रमंडळ, द्वारकामाई मित्रमंडळ व विनयनगर मित्रमंडळ यांच्या आकर्षक मूर्ती या सर्वांचे लक्ष वेधत आहे.

Web Title:  Emphasis on social scene in Indiranagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.