शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिकतेची कास धरत वन-वन्यजीव संवर्धनावर भर : पंकज गर्ग

By अझहर शेख | Updated: October 8, 2020 18:50 IST

नक्कीच, गुजरात सीमेला लागून असलेल्या पश्चिम भागातील हरसूल, पेठ या दोन रेंजच्या सीमा गुजरातच्या सीमेला लागून आहे. या रेंज अतीसंवेदनशील असल्या तरीदेखील या भागात वनरक्षकांची संख्या वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.

ठळक मुद्दे‘बॉर्डर मिटींग’ वेळोवेळी घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार मानव-बिबट संघर्ष उदभवणे हे दोघांसाठी घातकच गिधाडांचेही नाशिकमध्ये चांगल्याप्रकारे संवर्धन

नाशिकपश्चिम वनविभागाच्या उपवनसंरक्षकपदाची सुत्रे भारतीय वनसेवेची परीक्षा२०१७साली उत्तीर्ण केलेले पंकज कुमार गर्ग यांनी हाती घेतली आहे. मागील दीड महिन्यांपासून हे पद रिक्त होते. नवनिर्वाचित गर्ग यांनी नाशिक पश्चिम वनविभागाच्या उपवनसंरक्षकपदाचा पदभार स्विकारताच वनविभागाला आलेली मरगळ झटकण्यासाठी विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुर्णत्वास नेण्यासह आधुनिकतेची कास धरण्याचा मानस ‘लोकमत’कडे व्यक्त केला.--* नाशिकच्या वन-वन्यजीव संपदेविषयी काय सांगाल ?- मी मागील वर्षभरापासून नाशिक पश्चिम भागात प्रोबेशनरी म्हणून कार्यरत होतो. यामुळे मी पश्चिम भागातील बहुतांशी रेंजमध्ये भेटी देत पाहणी केली आहे. त्यावरुन असे लक्षात येते की नाशिक पश्चिम भागातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ तालुक्यांमध्ये वन आणि वन्यजीवसंपदा बऱ्यापैकी टिकून आहे. एकूणच नाशिक जिल्हा हा वनसंपदेबाबत तर समृध्द आहेच; मात्र वन्यजीवदेखील नाशिकमध्ये चांगल्याप्रकारे अस्तित्वात आहे. त्यांना पोषक असा अधिवास येथे नक्कीच विकसीत असल्याचे दिसून येते.* लालफितित अडकलेले विविध प्रकल्प कधी पुर्णत्वास येतील?- नाशिक पश्चिम वनविभागातंर्गत येणारे काही महत्त्वाचे प्रकल्प नक्कीच रखडलेले आहे. त्याबाबत मी आढावा घेत असून प्रकल्पांसाठी निधीची उपलब्धततेसाठी पाठपुरावा करणार आहे. ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर, गिधाड सुरक्षित क्षेत्र विकसीत करण्यासाठी अंजनेरी परिघात टेलिमेटरीद्वारे अभ्यास करणे हे दोन महत्त्वाचे प्रकल्प आहेत. जखमी वन्यजीवांवर उपचारासाठी ट्रान्झिट सेंटर अस्तित्वात येणे गरजेचे आहे. याबाबतचा प्रस्ताव काही महिन्यांपुर्वीच नागपुर प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.--* अतीसंवेदनशील रेंजमधील तस्करांची घुसखोरी रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातील?- हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. नक्कीच, गुजरात सीमेला लागून असलेल्या पश्चिम भागातील हरसूल, पेठ या दोन रेंजच्या सीमा गुजरातच्या सीमेला लागून आहे. या रेंज अतीसंवेदनशील असल्या तरीदेखील या भागात वनरक्षकांची संख्या वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. सध्या हरसूल, त्र्यंबकेश्वर या रेंजच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे त्यांची पदे रिक्त आहे; मात्र नाशिक रेंजरकडे या दोन्ही रेंजचा प्रभारी पदभार सोपविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे लवकरच गुजरात राज्याच्या वनविभागाच्या सीमावर्ती जिल्ह्यातील उपवनसंरक्षकांसोबत चर्चा करुन ‘बॉर्डर मिटींग’ वेळोवेळी घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. जेणेकरुन दोन्ही भागातील वनक्षेत्रात तस्करांची वाढती घुसखोरी रोखण्यास यश येईल.--* आपल्या विभागातील मानव-बिबट संघर्ष कसा कमी करणार?- निश्चितच, हादेखील महत्त्वाचा विषय आहे. मानव-बिबट संघर्ष उदभवणे हे दोघांसाठी घातकच आहे. यासाठी डिसेंबरअखेर दारणा नदीच्या खो-यालगत नाशिक तालुक्याच्या काही गावांमध्ये जनजागृतीपर अभियान काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून हाती घेण्यात येणार आहे. कोरोनाचे संक्रमण सध्या सुरु असल्यामुळे हा जनजागृतीपर उपक्रम तुर्तास पुढे ढकलला गेला आहे. तसेच नाशिक पश्चिम वनविभागाकडून वेळोवेळी मानव-वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी जनसामान्यांमध्ये स्वतंत्ररित्या फेसबुक, ट्विटरसारख्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण केली जाईल. वनरक्षकांना त्यांच्या बीटमध्ये वन्यप्राणी हल्ले रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना गरजेच्या आहेत, त्याचा प्रचार-प्रसारावर भर देण्याचे आदेश दिले गेले आहेत. तसेच विविध गावांमध्ये भीत्तीफलकांद्वारेदेखील जागृती केली जात आहे.-* वन्यजीवांच्या मृत्यूचे वाढत्या घटनांबाबत काय पावले उचलणार?- नाशिकमध्ये बिबटे, वानर, माकड, मोर, तरस, कोल्हे यांसारखे वन्यजीव आढळून येतात. एवढेच नव्हे तर धोक्याच्या प्रजातींमधील गिधाडांचेही नाशिकमध्ये चांगल्याप्रकारे संवर्धन झाले आहे. रस्ते अपघातात तसेच उघड्या विहिरींमध्ये कोसळून किंवा अन्नातून होणा-या विषबाधेतून अथवा नैसर्गिकरित्या आजारपणातून वन्यजीवांचा मृत्यू होण्याच्या घटना अलिकडे वाढल्याचे दिसून येते. नैसर्गिक, अपघाती हे दोन महत्त्वाचे कारण यामागे दिसून येते. नाशिक पश्चिम वनविभागात कुठेही वन्यजीवांची सापळा लावून अथवा खाद्यावर विषप्रयोग वगैरे करुन शिकार करण्यात आल्याचे आढळून आलेले नाही. वन्यजीवांचा मृत्यू कमी करण्यासाठी निश्चितच मुंबई-आग्रा महामार्ग, त्र्यंबकेश्वर रस्ता, नाशिक-हरसूल मुख्य रस्त्यावर नाशिक पश्चिम विभागाच्या हद्दीत जनजागृतीपर माहितीफलके वन्यजीवांच्या छायाचित्रांसह लवकरच उभारली जातील. जेणेकरुन वाहनचालकही सावध होऊन वाहने चालवितील.--शब्दांकन : अझहर शेख

 

 

 

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागwildlifeवन्यजीवenvironmentपर्यावरण